14 जुलै रोजी शिवसैनिक सतीश क्षीरसागर व विजय सरवदे यांच्या अंगावर टेम्पो घालून खून करण्यात आला होता. त्यातील चालक वगळता अन्य संशयित अद्यापही मोकाट आहेत.
मोहोळ (सोलापूर) : 14 जुलै रोजी झालेल्या मोहोळ (Mohol) येथील शिवसैनिकांच्या (Shivsainik) खूनप्रकरणी तपासाला गती मिळावी व संशयित आरोपींना गजाआड करावे, यासाठी शिवसेनेचे (Shivsena) जिल्हाप्रमुख गणेश वानकर (Shiv Sena district chief Ganesh Wankar) यांच्यासह पीडित कुटुंबातील सदस्यांसह मोहोळ तालुका शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते (Superintendent of Police Tejaswi Satpute) यांची भेट घेतली. संशयित आरोपींना लकरच गजाआड करू, असे आश्वासन सातपुते यांनी या वेळी दिले. (Superintendent of Police Satpute assured that the accused in the case of death of Shiv Sainiks at Mohol would be arrested soon-ssd73)
14 जुलै रोजी शिवसैनिक सतीश क्षीरसागर व विजय सरवदे यांच्या अंगावर टेम्पो घालून खून करण्यात आला होता. त्यातील चालक वगळता अन्य संशयित अद्यापही मोकाट आहेत. त्यांना अटक करावी तसेच या गुन्ह्याची सखोल चौकशी करून जे दोषी आहेत त्यांना कडक शासन व्हावे, अशी मागणी जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी केली. मोहोळ येथील रमाई घरकुलचे प्रकरण, बोगस मतदारांची नावनोंदणी व अन्य कारणे तपासण्याची मागणी पोलिस अधीक्षक यांच्याकडे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी केली.
चर्चेदरम्यान पोलिस अधीक्षक सातपुते यांनी, सर्व रेकॉर्ड तपासून दोषींना कठोरात कठोर शासन करण्यासाठी प्रशासन आपली भूमिका पार पाडेल. यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असणाऱ्या सर्वांना शासन करण्यात आम्ही कमी पडणार नसल्याची ग्वाही शिष्टमंडळाला दिली. या वेळी जिल्हाप्रमुख गणेश वानकर, दीपक गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, अशोक भोसले, महेश देशमुख, नागेश वनकळसे, महादेव गोडसे, विकास बनसोडे, अशोक गायकवाड, अविनाश क्षीरसागर, दादा क्षीरसागर, नारायण क्षीरसागर, अविनाश क्षीरसागर, विमल सरवदे, विश्रांता क्षीरसागर आदी उपस्थित होते.
आईची हात जोडून विनवणी
या वेळी मृत विजय सरवदे व सतीश क्षीरसागर यांच्या आईंनी हात जोडून न्याय द्या, अशी विनवणी केली. त्या वेळी पोलिस अधीक्षक सातपुते यांनी, पोलिस प्रशासन भक्कमपणे आपल्या पाठीशी आहे. आम्ही आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.