मोहोळ : भाजपाची दिल्लीतील अदृश्य शक्ती ही मराठी माणसाला त्रास देत आहे. गडकरी यांची खाती कमी केली, देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करून त्यांच ही डिमोशन केल. बाळासाहेबांची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हीच मराठी माणसांची खरी ताकद आहे, पण ती ओरबाडून घेतली.
भाजपा जातीजातीत भांडणे लावते. म्हणून त्यांना माझा विरोध आहे. मराठा, धनगर, लिंगायत व मुसलमान यांना आरक्षण देतो म्हणतात, नोकरी देताना कंत्राटी दिली मग त्यात आरक्षण मिळणार का? सध्याचे सरकार शाळा बंद करत आहे आणि दारु दुकाने वाढत आहेत. असा घनाघात खा सुप्रीया सुळे यांनी केला.
मोहोळ येथे पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी आयोजन केले होते त्यावेळी खा सुळे बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, आम्ही 60 वर्षात काय केलं असं विचारता, पण तुम्ही 9 वर्षात काय केलं ते सांगा.
आमचे सरकार येऊ द्या मोहोळ मधे महिला बचत गटाचे तालुका स्तरीय दुकान सुरू करू,हा माझा शब्द आहे. हसन मुश्रीफांना एकीकडे भ्रष्ट म्हणता आणि त्यांनाच पालकमंत्री करता हा दुटप्पीपणा चालणार नाही .एक तर भ्रष्ट हसन मुश्रीफ यांना पालकमंत्री नेमू नका नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेसची माफी मागावी असे आवाहन शेवटी त्यांनी केले.
खा सुळे यांचा सत्कार प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्या मातोश्री विठाबाई बारसकर यांनी केला. यावेळी महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे म्हणाल्या, महिलांचं आरक्षण म्हणजे गाजर आहे.2024 चा जुमला. आहे.महागाई वाढली आहे. महिलांनी ठरवल तर तुम्हाला हिसका दाखवू शकतात.एका रात्रीत नोट बंदी करता, मग महिलांच्या आरक्षणाला उशीर का?
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे मोहोळ तालुकाध्यक्ष रमेश बारसकर म्हणाले, मोहोळ येथील दुय्यम निबंध कार्यालय अनगर येथे नेले आहे ते रद्द करण्यात यावे,त्यासाठी आपण लक्ष घालावे अशी मागणी करत, आमदार यशवंत माने यांनी एकतर्फी काम केले आहे.
अजित पवार गटातर्फे मोहोळ मधून उत्तम जानकर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यावेळी मात्र यशवंत माने "रिव्हर्स गिअर" टाकून आपल्या कडे येतील तेव्हा त्यांना आपल्या पक्षात घेऊ नका. मोहोळ चे माजी आमदार राजन पाटील यांना खासदार पवारांनी ताकद दिली मात्र त्यांच्याच पाटीत खंजीर खुपसण्याचे काम माजी आमदार पाटील यांनी केले.
प्रास्ताविक शीलवंत क्षीरसागर यांनी केले. यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती. सुप्रिया सुळे यांचे आगमन होताच त्यांना क्रेन ने मोठा हार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी येत्या लोकसभेचे मतदान मतपत्रिकेद्वारे घेण्याच्या मागणीचे निवेदन खा सुळे यांना दिले.
यावेळी विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, नागेश फाटे, कविता म्हात्रे, शेखर माने, जयंत भंडारे, विठाबाई बारसकर, निशिगंधा कोल्हे, प्रभाकर देशमुख, अॅड. गोविंद पाटील, विनय पाटील, संगीता पवार, मंगेश पांढरे, तनवीर शेख, अनिता बळवंतराव, वर्षा दुपारगुडे, अतुल क्षीरसागर, नंदा गोरे, आदी सह अन्य मान्यवर उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.