Surekha Gobbur Success Story esakal
सोलापूर

लग्नानंतर पतीचं निधन, संकटात झुंजत सुरेख गोब्बुरांचा अनेकांना मदतीचा हात; राखीच्या धाग्याने जोडले तुटलेले 'संसार'

सुरेखा गोब्बूर या मुळच्या मैंदर्गीच्या आहेत. दहावी शिक्षण (10th Education) झाल्यानंतर त्या विवाहानंतर सोलापुरात आल्या.

सकाळ डिजिटल टीम

एका जोडप्याच्या पतीकडून चारित्र्याच्या संशयाचा आळ पत्नीवर आला. पत्नीवर संसार सोडून माहेरी जाणे किंवा आत्महत्या करणे यापैकी एक मार्ग स्वीकारण्याची वेळ आली. सुरेखा गोब्बूर यांनी आधी दोघांचे समुपदेशन केले.

सोलापूर : स्वतःच्या आयुष्यात सुरवातीपासून संघर्ष... लग्नानंतर पतीचे निधन... जिद्दीने केलेले शिक्षण... वैवाहिक जीवनात संकटे... तरीही एकल पालकाच्या भूमिकेत मुलीला स्वतःच्या पायावर सुरेखा गोब्बूर (Surekha Gobbur) यांनी उभे केले. केवळ राखीच्या धाग्याने इतरांचे तुटलेले संसार जुळवण्यापासून महिलांना आर्थिक स्वावलंबनासाठी अखंड प्रयत्नांची त्यांची जिद्द आजही कायम आहे.

सुरेखा गोब्बूर या मुळच्या मैंदर्गीच्या आहेत. दहावी शिक्षण (10th Education) झाल्यानंतर त्या विवाहानंतर सोलापुरात आल्या. अगदी सहा वर्षाच्या कालावधीत पतीचे निधन झाले. एका मुलीला घेऊन त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी धडपड सुरू केली. मार्केटिंगची कामे करत त्यांनी मुलीला शिकवत स्वतः आधी बारावी व नंतर पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

त्यांनी एकीकडे मुलीचे पालन पोषण व दुसरीकडे कमाईसाठी संघर्ष हा प्रवास न डगमगता सुरू ठेवला. सासरच्या नातेवाईकांनी त्यांना लढण्यासाठीचे पाठबळ कायम दिले. नंतर त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूची विक्री सुरू केली. नंतर त्या विमा क्षेत्रात उतरल्या. नामांकित विमा कंपन्यांमध्ये त्यांनी नोकरी केली. तेथे त्यांना कर्नाटकच्या मायक्रोफायनान्स (Microfinance Company) करणाऱ्या एका बॅंकेत शाखाधिकारी म्हणून नोकरी मिळाली. या पदावर काम करताना त्यांनी अगदी मराठवाड्यात जाऊन काम केले. या सेवेत त्यांनी महिलांना स्वावलंबनाचे धडे देण्याचा अनुभव सामाजिक कामात उपयोगाला आणला.

या कामात भेटलेल्या महिलांनी त्यांना सासरी होणाऱ्या त्रासाचे अनुभव सांगितले. तेव्हा त्यांनी पती-पत्नींची भांडणे सोडवण्याचे काम सुरू केले. अनेक पुरुषांना त्यांनी राखीच्या धाग्याने नाती करत महिलांचे तुटलेले संसार जोडले. त्यासाठी समुपदेशनाचे कौशल्य त्यांनी उपयोगात आणले. नंतर त्यांनी नोकरी सोडून सोलापुरात सौंदर्यप्रसाधने व साहित्य विक्रीचा व्यवसाय सुरू केला. आज त्यांची मुलगी देखील पदवीधर होऊन पुण्यात जॉब करत स्वावलंबी झाली. आता त्या व्यवसायासोबत उर्वरित वेळ विजापूर रोड मध्यवर्तीच्या माध्यमातून सामाजिक कार्यात देतात.

  • पतीच्या निधनानंतर बारावी व पदवीचे शिक्षण घेतले

  • मुलींचा सांभाळ करत व्यवसायातून स्वावलंबन

  • महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचे अखंड कार्य

  • समुपदेशनातून जुळवले तुटणारे संसार

  • सासरच्या नातेवाईकांकडून कायम पाठबळ

एका जोडप्याच्या पतीकडून चारित्र्याच्या संशयाचा आळ पत्नीवर आला. पत्नीवर संसार सोडून माहेरी जाणे किंवा आत्महत्या करणे यापैकी एक मार्ग स्वीकारण्याची वेळ आली. सुरेखा गोब्बूर यांनी आधी दोघांचे समुपदेशन केले. नंतर त्यांनी पीडित महिलेच्या पतीची संशयातून सुटका करत पुन्हा त्यांचा संसार स्थिर केला. नंतर या दांपत्याला दोन अपत्ये देखील झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT