ahilyadevi-holkar SOLAPUR UNIVERCITY sakal
सोलापूर

‘सिनेट’वर ‘सुटा’चेच वर्चस्व! संस्थाचालकांत मोहिते-पाटील, साठे, रोंगे, पाटील, गांधी विजयी

विद्यापरिषदेचे पाच, महाविद्यालयीन शिक्षकांमधून दहापैकी आठ आणि सर्वच अभ्यास मंडळावरही (इंग्रजी, प्राणीशास्त्र वगळून) ‘सुटा’नेच (सोलापूर विद्यापीठ शिक्षक संघटना) बाजी मारली. विद्यापीठ विकास मंचला अपेक्षित यश मिळविता आले आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत सर्वच अधिकार मंडळांवर ‘सुटा’ने वर्चस्व कायम राखले. विद्यापरिषदेचे पाच, महाविद्यालयीन शिक्षकांमधून दहापैकी आठ आणि सर्वच अभ्यास मंडळावरही (इंग्रजी, प्राणीशास्त्र वगळून) ‘सुटा’नेच (सोलापूर विद्यापीठ शिक्षक संघटना) बाजी मारली. विद्यापीठ विकास मंचला पदवीधरमधून चांगले यश मिळविता आले.

विद्यापीठाच्या संस्थाचालक मतदारसंघातून राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव अजिंक्यराणा पाटील व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या सून वैशाली साठे या विजयी झाल्या आहेत. त्यांच्यासोबत विद्यापीठ विकास मंचकडून सूरज रोंगे तर वालचंद समूहातर्फे वैभव गांधी हे विजयी झाले. पहिल्या फेरीत पाटील यांना सर्वाधिक १४, वैशाली साठे यांना ११, रोंगे व गांधी यांना प्रत्येकी दहा मते मिळाली. प्रतिस्पर्धी उमेदवार मिलिंद कुलकर्णी यांना आठ मते मिळाली होती. दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाची मते मोजून झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव योगिनी घारे यांनी विजयी उमेदवारांची घोषणा केली. पद्मजादेवी मोहिते-पाटील यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. विद्यापीठ शिक्षकांमधून डॉ. प्रभाकर कोळेकर व डॉ. विकास कडू यांनी बाजी मारली. पदवीधरमधून रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे हेही बिनविरोध झाले असून मतमोजणीनंतर ॲड. मंकणी व ॲड. उषा पवार हे विजयी ठरले.

‘पदवीधर’मध्ये सर्वाधिक मते बाद

पदवीधरसाठी ४८ टक्के मतदान झाले, त्यातही बाद मतांची संख्या मोठी राहिली. दोन उमेदवार विजयी झाल्यानंतर पुढील जागांच्या मतमोजणीत पहिल्या फेरीत कोणालाच कोट्याप्रमाणे मते मिळाली नाहीत. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकाची मते मोजावी लागली. दरम्यान, बाद मतांमुळे उमेदवारांची धाकधूक वाढली होती. रात्रभर मतमोजणी सुरुच होती.

महाविद्यालयीन शिक्षकांमध्ये ‘सुटा’ला आठ जागा

  • वालचंद समूह : डॉ. वंदना गवळी

  • शैक्षणिक महासंघ : डॉ. वीरभद्र दंडे

  • ‘सुटा’ : डॉ. भगवान आदटराव, डॉ. शिरीष भोसले, डॉ. समाधान पवार, डॉ. सिमा गायकवाड, डॉ. सुशील शिंदे, डॉ. शिरीष शिंदे, डॉ. जैनुद्दीन मुल्ला, डॉ. नितीन तळपाडे.

अभ्यास मंडळावर ‘सुटा’चेच वर्चस्व

  • वालचंद समूह : डॉ. मनोहर जोशी, डॉ. राजशेखर हिप्परगी

  • विद्यापीठ विकास मंच : डॉ. लक्ष्मीकांत दामा

  • ‘सुटा’ : डॉ. अब्दुल शेख, डॉ. सतीश देवकर, डॉ. विशाल कदम, डॉ. संध्या साळुंखे, डॉ. सुग्रीव गोरे, डॉ. विद्युलता पांढरे, डॉ. प्रशांत ठाकरे, डॉ. समाधान माने, डॉ. रामराजा मोटे.

‘पदवीधर’चा अंतिम निकाल आज

  • विद्यापीठ विकास मंच : ॲड. निता मंकणी, बंकुर चन्नबसप्पा, देशमुख अजिंक्य, यतीराज होनमाने, वर्षाराणी कामुर्ती.

  • सुटा : ॲड. उषा पवार (युवासेना), डॉ. सचिन गायकवाड, गणेश डोंगरे, राजाभाऊ सरवदे.

  • वालचंद समूह : अजित संगवे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik : 'या मुन्नाचा भांगसुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही'; खासदार महाडिकांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या बाईक रॅलीला सुरूवात

मृणाल दुसानिस झाली बिसनेसवूमन! ठाण्यात 'या' ठिकाणी सुरू केलं नवं हॉटेल; पाहा आतून कसं आहे अभिनेत्रीचं 'बेली लाफ्स'

सावधान! व्हॉट्सॲपवर लग्नाची आमंत्रण पत्रिका येताच क्लिक करू नका, नाहीतर होईल मोठी फसवणूक, वाचा 'या' नव्या स्कॅमबद्दल

जिगर लागतो...! खांद्याला दुखापत, तरीही ऑस्ट्रेलियन खेळाडूने संघासाठी एका हाताने केली फलंदाजी

SCROLL FOR NEXT