Swami Govind Giri Maharaj esakal
सोलापूर

'बांगलादेशात जे घडतंय, ते आपल्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही'; गोविंद गिरी महाराजांनी हिंदू समाजाला केलं सावध

सकाळ डिजिटल टीम

आगामी निवडणुकीत हिंदूंनी १०० टक्के मतदान करावे, असे आवाहन विहिंपचे प्रांत मंत्री किशोर चव्हाण यांनी केले.

सोलापूर : आज बांगलादेशात जे घडत आहे ते आपल्या घरापर्यंत येण्यास विलंब लागणार नाही. त्यामुळे हिंदू समाजाने सजग राहण्याची गरज आहे. त्याकरिता हिंदूहिताचा विचार करणाऱ्यांच्या पाठीशी एकजुटीने उभे राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प. पू. स्वामी गोविंद देव गिरी महाराज (Swami Govind Dev Giri Maharaj) यांनी केले. सोमवारी विश्व हिंदू परिषदेच्या (Vishwa Hindu Parishad) षष्ठ्यब्दी पूर्तीनिमित्त येथे आयोजित धर्माचार्य चिंतन संमेलनात ते बोलत होते.

सध्या विरोधकांनी हिंदू धर्माबद्दल (Hindu Religion) अपप्रचार सुरू केला आहे. त्यास आळा घालण्यासाठी धर्माचार्य चिंतन संमेलन होत असल्याची माहिती विहिंपचे क्षेत्रीय धार्मिक पुंज प्रमुख संजय मुद्राळे यांनी दिली. आगामी निवडणुकीत हिंदूंनी १०० टक्के मतदान करावे, असे आवाहन विहिंपचे प्रांत मंत्री किशोर चव्हाण यांनी केले. सर्व धर्माचार्यांनी धर्मप्रसारासाठी जास्तीत जास्त वेळ द्यावा, असे आवाहन अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज यांनी केले.

श्री श्रीकंठ शिवाचार्य स्वामी म्हणाले, वसुधैव कुटुंबकम हा आपला विचार आहे. तसे संस्कार प्रत्येक कुटुंबात व्हायला हवेत. शिवाजी महाराज मोरे, लक्ष्मण चव्हाण महाराज, मारुती तुणतुणे महाराज, शीख धर्मगुरू रमेश सिंह यांनीही मार्गदर्शन केले. व्यासपीठावर नीलकंठ हिरेमठ स्वामी, राचोटेश्वर स्वामी, शिवलिंगेश्वर स्वामी, विहिंपचे जिल्हाध्यक्ष अभिमन्यू डोंगरे महाराज उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Department Scam: स्वच्छतेच्या नावाखाली आरोग्य विभागाचा 3,200 कोटींचा घोटाळा? वडेट्टीवारांनी सादर केली कागदपत्रं

Latest Maharashtra News Updates: सीनेट निवडणूक दुसरा निकाल हाती, युवा सेना ठाकरे गटाच्या शीतल देवरुखकर (SC) 5498 मतांनी विजयी

Crime: मुंबई हादरली! पत्नीवर अॅसिड हल्ला, पतीचं संतापजनक कृत्य, धक्कादायक कारण समोर

Devendra Fadnavis: फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेची ओळख पटली; सोसायटीमध्ये चाकू घेऊन फिरते....

Binny and Family : जुन्या आणि नवीन पिढीला विचार देणारा 'बिन्नी अ‍ॅण्ड फॅमिली' चित्रपट

SCROLL FOR NEXT