सोलापूर

तुमचे फेक फेसबूक अकाउंट कोणीही उघडू नये म्हणून करा 'या' गोष्टी

तात्या लांडगे

विशेषत: मुली व महिलांच्या सर्वाधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्याची दखल घेऊन सायबर क्राईमने ती बनावट खाती तत्काळ बंद करून टाकली आहेत.

सोलापूर : कोरोना (Corona)काळात अडचणीत सापडलेले तरुण पैसे मिळविण्याच्या हेतूने सोशल मीडियावर (Social Media) वेगवेगळ्या क्‍लुप्त्या करीत आहेत. एप्रिल ते 31 मे 2021 या काळात शहरातील 29 जणांनी आमच्या नावाचे फेक अकांउट (Fake Account) तयार करून पैसे मागितले, बदनामी केली, अशा तक्रारी सायबर क्राईमकडे (Cyber ​​Crime) दिल्या आहेत. (take care of some things so that no one can open your fake facebook account)

सोलापूर शहर-जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्ण व मृतांची नोंद झाली. राज्यभर अशीच परिस्थिती असल्याने अजूनही कडक निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे हातावरील पोट असलेल्यांना जगणे मुश्‍किल झाले आहे. तर दुसरीकडे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने अनेक तरुण-तरुणी घरातच बसून आहेत. या पार्श्‍वभूमीवर चोरी, घरफोडी, सोशल मिडियातून फेक अकांउंट तयार करून ओळखीच्या व्यक्‍तीला पैसे मागण्याचे प्रकार वाढले आहेत. ऍड. मंजुनाथ कक्‍कलमेली यांच्या बाबतीत काही दिवसांपूर्वी असाच प्रकार घडला होता. दरम्यान, बहुतांश व्यक्‍तींनी मोबाईल खरेदी केल्यानंतर फेसबूक अकांउंट उघडताना त्यांचे नाव आणि पासवर्ड म्हणून मोबाईल क्रमांक टाकलेला असतो. ही संधी साधून समोरील व्यक्‍ती तसा प्रयोग करतो आणि त्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर तो त्याच्याच ओळखीच्या व्यक्‍तीकडून पैशाची मागणी करतो.

सध्या कोरोनाचा काळ असल्याने समोरील व्यक्‍तीला पैशाची अडचण असेल म्हणून काहीजण त्याने पाठविलेल्या लिंकवर क्‍लिक करून पैसे पाठवितात. तसेच दुसऱ्याच्या नावे फेसबूक खाते उघडून त्यावरुन समोरील व्यक्‍तीला अश्‍लिल मेसेज, व्हिडिओ पाठविले जातात. त्या व्यक्‍तीचे फोटो त्यावर अपलोड केले जातात. अशा प्रकारच्या विशेषत: मुली व महिलांच्या सर्वाधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्याची दखल घेऊन सायबर क्राईमने ती बनावट खाती तत्काळ बंद करून टाकली आहेत.

कोरोनाच्या काळात अनेकांना पैशाची गरज कधीही पडते. ही संधी साधून फेसबूकवर बनावट खाते उघडून त्या व्यक्‍तीच्या नावावर पैसे मागणी केली जात आहे. काहीवेळा बदनामीच्या हेतूने मुली, महिला, तरुणांचे फोटो फेक अकांउंटवरून अपलोड करण्याचेही प्रकार घडले आहेत. दोन महिन्यात जवळपास 30 तक्रारी आल्या असून संबंधित बनावट फेसबूक खाती बंद केली आहेत.

- विशेंद्रसिंग बायस, पोलिस उपनिरीक्षक, सायबर क्राईम, सोलापूर

"अशी' घ्यावी खबरदारी...

- ओळखीच्या तरुण-तरुणी, महिलांकडून फ्रेंड रिक्‍वेस्ट आल्यास त्याची खातरजमा करा

- फेसबूकचा पासवर्ड मोबाईल क्रमांक असू नये; काही दिवसांनी तो सतत बदलावा

- सोशल मीडियातून पैशांची मागणी झाल्यास संबंधित मित्राला थेट संपर्क करा; ऑनलाईन लिंकवर विश्‍वास ठेवू नका

- बनावट फेसबूक अकांउंट तयार करून काही आक्षेपार्ह अथवा अश्‍लिल फोटो, व्हिडिओ अपलोड होत असल्यास तत्काळ सायबर क्राईमकडे तक्रार करा.

(take care of some things so that no one can open your fake facebook account)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT