Corona esakal
सोलापूर

दोन डोस घ्या अन्‌ सुरक्षित व्हा! दोन्ही डोस घेतलेले जिल्ह्यातील 22 लाख व्यक्‍ती सुरक्षित

जगातील काही देशांमध्ये कोरोना पुन्हा वाढतोय, आपल्याकडे तो कधीही येऊ शकतो. त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्‍ती वाढण्यासाठी सर्वांनी लसीचे दोन्ही डोस टोचून घ्यावेत. लस घेतल्यानंतर प्रत्येकजण सुरक्षित होऊ शकतो. लसीचे दोन्ही डोस घेऊन ज्यांना नऊ ते दहा महिने झालेल्या 40 वर्षांवरील सर्वांनी बुस्टर डोस घेणे आवश्‍यक आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनाची तिसरी लाट ओसरली असतानाच आता चीन, युरोप, दक्षिण कोरियात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्‍तांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. 12 वर्षांवरील सर्वांनाच प्रतिबंधित लस टोचून त्यांना सुरक्षित करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, लसीचे दोन्ही डोस घेतलेले जिल्ह्यातील 22 लाख 31 हजार 250 व्यक्‍ती कोरोनापासून सुरक्षित झाल्या आहेत.

कोरोनापासून नागरिकांना सुरक्षित करण्याच्या हेतूने राज्यात जानेवारी 2021 पासून प्रतिबंधित लसीकरण सुरु करण्यात आले आहे. लसीकरण सुरु झाल्यापासून 19 मार्च 2022 पर्यंत शहरातील सहा लाख 37 हजार 277 जणांनी तर ग्रामीणमधील 23 लाख 43 हजार 149 जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. दुसरीकडे त्यापैकी शहारतील चार लाख 73 हजार 849 व्यक्‍तींनी तर ग्रामीणमधील 17 लाख नऊ हजार 909 व्यक्‍तींनी दुसरा डोस टोचून घेतला आहे. लस टोचलेल्यांनी कोरोना होणार नाही या अविर्भावात न राहता त्यांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्‍यक असल्याचे मत आरोग्य विभागाने नोंदविले आहे. दरम्यान, आतापर्यंत ज्यांनी लस घेतलेलीच नाही किंवा एकच डोस घेतला आहे, त्यांनी लस टोचून सुरक्षित व्हावे, असे आवाहनही आरोग्य विभागाने केले आहे. राज्यात तथा देशात अजूनपर्यंत कोरोनाची चौथी लाट आलेली नाही, परंतु जगभरातील वाढत्या कोरोनाचा विचार करताना सर्वांनी सावधगिरी बाळगायला हवी, असेही स्पष्ट केले आहे. दरम्यान, ज्या भागात सर्दी, खोकल्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असतील तर त्याठिकाणी स्वतंत्र सर्व्हेक्षण करून त्यांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोना झाल्यास संबंधित व्यक्‍ती मृत्यूच्या दारापर्यंत जाण्याची शक्‍यता खूपच कमी राहते. त्यामुळे प्रत्येकांनी (12 वर्षांवरील सर्वांनी) लसीचे दोन्ही डोस घ्यायलाच हवेत, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

40 वर्षांवरील सर्वांनी बुस्टर डोस घेणे आवश्‍यक

जगातील काही देशांमध्ये कोरोना पुन्हा वाढतोय, आपल्याकडे तो कधीही येऊ शकतो. त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्‍ती वाढण्यासाठी सर्वांनी लसीचे दोन्ही डोस टोचून घ्यावेत. लस घेतल्यानंतर प्रत्येकजण सुरक्षित होऊ शकतो. लसीचे दोन्ही डोस घेऊन ज्यांना नऊ ते दहा महिने झालेल्या 40 वर्षांवरील सर्वांनी बुस्टर डोस घेणे आवश्‍यक आहे.
- डॉ. शितलकुमार जाधव, जिल्हा आरोग्याधिकारी, सोलापूर

  • प्रत्येक लसीचे निकष...
    1) कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवसांनी दुसरा डोस घ्यावा
    2) कोवॅक्‍सिन लसीचा दुसरा डोस किमान 28 दिवसांनी घेणे आवश्‍यक
    3) कोर्बोवॅक्‍स लसीचा पहिला डोस घेऊन एक महिना पूर्ण झालेल्यांनी दुसरा डोस घ्यावा
    4) लसीमुळे दहा महिन्यांपर्यंत शरीरात राहते रोगप्रतिकारकशक्‍ती; त्यानंतर बुस्टर डोस आवश्‍यकच

लसीकरणाची सद्यस्थिती...
18 वर्षांवरील व्यक्‍तींचे टार्गेट
34,14,400
पहिला डोस घेतलेले
29,80,426
दुसरा डोस घेतलेले
21,83,748
लस शिल्लक
2,00000
-------
15 ते 17 वयोगटाचे टार्गेट
2,26,412
पहिला डोस घेतलेले
1,05,696
दुसरा डोस घेतलेले
46,689
लस शिल्लक
75,000
--------
12 ते 14 वयोगटातील टार्गेट
2,42,566
पहिला डोस घेतलेले
1,813
दुसरा डोस घेतलेले
0000
लस शिल्लक
20,000

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Devendra Fadnavis : फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एक है तो 'सेफ' है!

Karad South Assembly Election 2024 Results : कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग! पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करत अतुल भोसलेंचा मोठा विजय

Madha Assembly Election 2024 Result Live: माढ्यात तुतारीची गर्जना, अभिजित पाटील यांचा दणदणीत विजय

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

SCROLL FOR NEXT