ESAKAL
सोलापूर

Politics: मविआ सोबत भाजपला धक्का! बडा नेता 'बीआरएस'च्या वाटेवर? केसीआर'यांची घेतली भेट

सकाळ डिजिटल टीम

लातूर: नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करू पाहणाऱ्या भारत राष्ट्रीय समितीच्या (बीआरएस) गळाला लातूरचे भारतीय जनता पक्षाचे माजी महापौर सुरेश पवार लागले आहेत. त्यांनी हैदराबाद येथे जाऊन समितीचे अध्यक्ष व तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा सत्कार केला. या पक्षात त्यांच्या प्रवेशाच्या चर्चेला शहरात आता उधाण आले आहे.

माजी महापौर सुरेश पवार हे खरे तर काँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते. काँग्रेसतर्फे ते तत्कालीन नगरपालिकेत पाच वेळा नगरसेवक झाले. गेल्या महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस नेतृत्वाशी त्यांचे जमले नाही.

त्यामुळे त्यांनी भाजपचे नेते संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षात प्रवेश केला. महापालिका निवडणुकीत विजयी झाल्यानंतर निलंगेकरांनी त्यांना महापौरपद दिले. अडीच वर्षे ते महापौर पदावर कार्यरत होते, पण या पदावर त्यांना छाप टाकता आली नाही.

तेथेही त्यांचे नेतृत्वाशी शेवटी जमले नाही. काही महिन्यापूर्वीच त्यांच्या मुलाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून सुरेश पवार हे देखील राष्ट्रवादीमध्ये जातील अशी चर्चा सुरु झाली होती. पण तसे झाले नाही.

दरम्यान, सुरेश पवार यांनी हैदराबादेत जाऊन राव यांचा नुकताच सत्कार केला. त्यांच्याशी चर्चाही केली. यावेळी शेतकरी नेते शंकरअण्णा धोंडगे उपस्थितीत होते. यासदर्भात पवार यांच्याशी संपर्क साधला असता, शांतिदूत परिवाराच्या वतीने तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना पुरस्कार देण्यासाठी हैदराबादला गेलो होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT