राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण परीक्षेमुळे सुट्ट्यांचा कालावधी कमी करण्यात आला.
सोलापूर : कोरोनामुळे (Corona) पहिली ते बारावीच्या शाळा (School) बंद राहिल्या आणि 4 ऑक्टोबर 2021 पासून ऑनलाइन अध्यापन (Online teaching) सुरु झाले. कोरोना कमी झाल्यानंतर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या काळात सुट्टी जाहीर झाली. मात्र, राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (National Editing Survey) परीक्षेमुळे सुट्ट्यांचा कालावधी कमी करण्यात आला. आता तीन दिवसांची शिल्लक सुट्टी ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रेच्या निमित्ताने देण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी घेतला आहे.
राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून (मार्च 2020) संपूर्ण शाळा बंद करण्याचा निर्णय झाला. ऑफलाइन शाळा (Offline school) बंद असतानाही शिक्षकांना ऑनलाइन अध्यापन करावे लागले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर काही दिवसांसाठी शाळा उघडल्या, परंतु पुन्हा त्या बंद कराव्या लागल्या. 23 नोव्हेंबरपासून आता पुन्हा शाळा ऑफलाइन सुरु झाल्या आहेत. तत्पूर्वी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना दिवाळीच्या निमित्ताने 14 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली. कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण, शाळेतील हजेरी आणि पुन्हा घरोघरी जाऊन को-मॉर्बिड रुग्णांचा सर्व्हे (Co-Morbid Patient Survey), याला वैतागलेले शिक्षक आनंदी झाले. सुट्ट्यांचा आनंद घेत असतानाच शालेय शिक्षण विभागाने सुट्ट्यांचा कालावधी कमी करण्याचा निर्णय घेतला. 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण (National Editing Survey) परीक्षेमुळे तीन दिवसांची सुट्टी कमी करण्यात आली. स्थानिक पातळीवर संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी शिल्लक सुट्ट्यांसंबंधी निर्णय घ्यावा, असे आदेशही शालेय शिक्षण विभागाने दिले. आता नाताळच्या निमित्ताने काही जिल्ह्यांनी शिक्षकांना सुट्टी दिली, परंतु सोलापूर जिल्ह्यात ग्रामदैवत श्री सिध्देश्वर महाराजांची यात्रा 12 ते 16 जानेवारी या काळात मोठ्या उत्साहात साजरी होते. 14 जानेवारीला संक्रात असल्याने 12 ते 15 या कालावधीत तीन दिवसांची सुट्टी दिली जाणार आहे.
शिक्षक संघटनांशी बोलून अंतिम निर्णय
प्राथमिक शिक्षकांची रद्द झालेली तीन दिवसांची सुट्टी ग्रामदैवत श्री सिध्देश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त दिली जाणार आहे. तत्पूर्वी, प्राथमिक शिक्षक संघटनांसोबत चर्चा केली जाणार असून त्यांना प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी निमंत्रित केले आहे. प्राथमिक शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर त्यासंदर्भातील अंतिम निर्णय पुढील आठवड्यात जाहीर होईल, असेही प्राथमिक शिक्षणाधिकारी लोहार यांनी 'सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.