Students 
सोलापूर

खुषखबर! दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मिळणार "या' दिवशी गुणपत्रिका

तात्या लांडगे

सोलापूर : राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी तंत्रशिक्षण, पदविका अभ्यासक्रम, त्याचे महत्त्व, फायदे, प्रवेश प्रक्रिया व त्यासाठी लागणारी कागदपत्रे याची माहिती सोशल मीडियातून पाठविली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेयर, अल्पसंख्याक प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. त्यामुळे पुणे बोर्डाने 17 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका छपाईचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. 15 ऑगस्टपूर्वी त्यांना गुणपत्रिका दिल्या जाणार आहेत. 

बारावीनंतरच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत म्हणून पुणे बोर्डाकडून गुणपत्रिका महाविद्यालयांमध्ये पोच करण्यात आल्या आहेत. त्यानुसार 31 जुलैपासून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वाटप सुरू करण्यात आले आहे. आता दहावीनंतरच्या पुढील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होत आहेत. तूर्तास विद्यार्थ्यांनी संबंधित अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. त्यानंतर कॉलेज, अभ्यासक्रम आणि पसंतीक्रम भरले जात आहेत. मात्र, प्रवेश निश्‍चितीसाठी विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण संचालनालयाच्या आदेशानुसार गुणपत्रिकांसह अन्य कागदपत्रे जोडणे बंधनकारक असणार आहे. त्यादृष्टीने पुणे बोर्डाकडून नियोजन करण्यात आले आहे. 

पुणे बोर्डचे सचिव डॉ. अशोक भोसले म्हणाले, बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 31 जुलैपासून गुणपत्रिका वितरीत करणे सुरू झाले आहे. आता दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी गुणपत्रिका वेळेत मिळाव्यात या हेतूने युद्धपातळीवर काम सुरू आहे. दोन-चार दिवसांत संबंधित महाविद्यालयांना गुणपत्रिका पोच केल्या जातील. 

महाविद्यालयात जाऊन करा प्रवेश निश्‍चित 
राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पदविका तथा अभियांत्रिकी तंत्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी माहिती पुस्तिका उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन सुविधा केंद्रांवरून प्रवेशाचा अर्ज करावा. कॉलेज, अभ्यासक्रम आणि पसंतीक्रम ऑनलाइन भरावा, असे पहिले दोन टप्पे सांगितले आहेत. त्यानंतर प्राप्त गुणांनुसार कोणते कॉलेज व अभ्यासक्रम मिळाला हे पाहिल्यावर संबंधित ऑनलाइन केंद्रांवर जाऊन प्रवेश निश्‍चित करून घ्यावा. शेवटी ज्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे, त्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन प्रवेश निश्‍चित करून घ्यावा, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Oath Ceremony: महायुतीच्या बैठकांचा धडाका, पुढील रणनिती आखण्यावर चर्चा, शपथविधीबाबत मोठी माहिती समोर!

'अरे.. हसताय काय, टाळ्या काय देताय? माझा माणूस पडला राव..'; कोणाला उद्देशून बोलले अजित पवार?

जमलं रे जमलं ! 'या' महिन्यात तमन्ना आणि विजय वर्मा करणार लग्न ;

Maharashtra Assembly Result: अजितदादांचा आनंद द्विगणित! पुण्यातील आमदाराच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार? 'या' तीन नावांची चर्चा

IND vs AUS : Yashasvi Jaiswal च्या दीडशतकी खेळीने रचला नवा विक्रम ; दिग्गजांमध्ये स्थान मिळवणारा पहिला भारतीय

SCROLL FOR NEXT