ड्रेनेजमध्ये गुदमरून चौघांचा मृत्यू! गुन्ह्यातील कलम वाढवून 'एसीपी' करणार तपास Sakal
सोलापूर

ड्रेनेजमध्ये गुदमरून चौघांचा मृत्यू! कलम वाढवून 'ACP' करणार तपास

ड्रेनेजमध्ये गुदमरून चौघांचा मृत्यू! गुन्ह्यातील कलम वाढवून 'एसीपी' करणार तपास

तात्या लांडगे

एमआयडीसी परिसरातील मुद्रा सनसिटीजवळील ड्रेनेजलाइनमध्ये उतरलेल्या चौघांचा गुदमरून मृत्यू झाला होता.

सोलापूर : एमआयडीसी (MIDC) परिसरातील मुद्रा सनसिटीजवळील ड्रेनेजलाइनमध्ये उतरलेल्या चौघांचा गुदमरून मृत्यू झाला होता. याप्रकरणी महापालिकेच्या संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी, दास आफशोअर, व्रज कन्स्ट्रक्‍शनचे अधिकारी व कर्मचारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे (Maharashtra Jeevan Pradhikaran) अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत (MIDC Police, Solapur) गुन्हा (Crime) दाखल झाला आहे. पोलिस आयुक्‍त (Police Commissioner) हरीश बैजल (Harish Baijal) यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सुरू असून आता पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्‍तांकडे सोपविला जाणार आहे. (The ACP will now conduct further investigation into the drainage line accident case)

ड्रेनेजलाइनचे काम पूर्ण झाल्यानंतर तांत्रिक अडचणी तपासण्यासाठी आत उतरलेल्या सहापैकी चौघांचा गुदमरून मृत्यू झाला. दोघेजण बेशुद्ध आढळले आणि त्यांच्यावर वेळेत उपचार झाल्याने त्यांचा जीव वाचला. घटनेनंतर त्या कामगारांच्या मृत्यूला जबाबदार कोण, असा प्रश्‍न उपस्थित झाला. शेवटी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पेटकर (Nitin Petkar) यांनी स्वत: पोलिसांत फिर्याद दिली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. जीवघेणे काम करत असतानाही तेथील इंजिनिअर, सुपरवायझर व कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ऑक्‍सिजन मास्क (Oxygen Mask), ग्लोव्ह्‌ज (Gloves), सेफ्टी बेल्ट (Safety Belt), बाहेरून ऑक्‍सिजन पुरवणारी साधने पुरविण्यात आली नाहीत. त्याचा ठपका महापालिकेचा संबंधित विभाग, कंत्राटदार कंपनी आणि ज्यांच्या नियंत्रणाखाली काम सुरू होते, त्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पवार (Sanjay Pawar) यांच्याकडे सध्या या गुन्ह्याचा तपास असून गुन्हा दाखल झालेल्या संबंधितांना त्यांनी चौकशीसाठी बोलावणे धाडले आहे.

महापालिकेकडून अद्याप मदत नाहीच

एमआयडीसी परिसरातील नव्या ड्रेनेजलाइनमध्ये गुदमरून चार कामगारांचा मृत्यू झाला. ही घटना 23 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. मृतांमधील कामगार तरुणच होते. ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगत महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर (P. Shivshankar) यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले. दुसरीकडे, महापौर श्रीकांचना यन्नम (Shrikanchana Yannam) यांनी मृतांना प्रत्येकी दहा लाखांची मदत घोषित केली. दोन-तीन दिवसांत मदत मिळेल, अशी आशा होती. परंतु, पाच दिवस होऊनही अद्याप दमडीचीही मदत मिळालेली नाही.

अल्पवयीन मुलगा कामावर कसा?

सांगली (Sangli) जिल्ह्यातील अभियंत्यांसह बिहार (Bihar), राजस्थान (Rajasthan), उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) एकूण चार कामगारांचा ड्रेनेजमध्ये गुदमरून मृत्यू झाला. मृतांमध्ये बैचन प्रभू ऋषिदेव (रा. बिहार), विशाल शिवाजी हिप्परकर (रा. सांगली), सुनील गुलजारीलाल ढाका (रा. राजस्थान) आणि आशिषकुमार भारतसिंग राजपूत (रा. उत्तर प्रदेश) यांचा समावेश होता. विशेष बाब म्हणजे 18 वर्षांखालील मुलाला बालमजूर समजून त्यासंदर्भात कडक कायदे करण्यात आले आहेत. तरीही, ड्रेनेजमध्ये गुदमरून मृत्यू झालेल्या चौघांमध्ये आशिषकुमार राजपूत हा 17 वर्षांचा असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबंधित मक्‍तेदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्या बालमजुराला कामावर ठेवलेच कसे, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT