जिल्ह्यातील साडेपाच लाख विद्यार्थ्यांकडे अँड्रॉईड मोबाईल नाहीत. ऑनलाइन शिक्षणाचे फायदे असले, तरीही अनेक तोटे समोर आले.
सोलापूर : सेतू अभ्यासक्रमात (Bridge course) 100 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती नाही. शिक्षकांनी गृहभेटी सुरू केल्या, परंतु पालकांचा त्याला विरोध असून मुलेही घरी नसतात. जिल्ह्यातील साडेपाच लाख विद्यार्थ्यांकडे अँड्रॉईड मोबाईल नाहीत. ऑनलाइन शिक्षणाचे (Online Education) फायदे असले, तरीही अनेक तोटे समोर आले. तरीही, शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कार्यवाही सुरू असतानाच मागे वळून पाहिल्यावर मुलांची पाटी कोरीच असल्याची वस्तुस्थिती आहे. भविष्यातील पिढीला शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी कृतीयुक्त तथा त्यांच्या आवडीनुसार शिक्षण देण्याची गरज असल्याचे मत प्राथमिक शिक्षकांनी 'सकाळ'च्या माध्यमातून व्यक्त केले. (The advantages and disadvantages of online education are obvious-ssd73)
कोरोनामुळे (Covid-19) मार्च 2020 पासून शाळा बंद असल्याने नव्याने शाळेत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना "शाळा' आणि "शिक्षक' म्हणजे काय हे शिकवावे लागेल. पहिली, दुसरीतील विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी सुधारण्यासाठी उपचारात्मक अध्यापनाची खूप मोठी गरज भासणार आहे. अजूनही वेळ गेली नसल्याने शासनाने कोरोनामुक्त गावांमध्ये, नगरांमध्ये मोजक्याच विद्यार्थ्यांची टप्प्याटप्प्याने ऑफलाइन शाळा (वर्ग) घेण्यास परवानगी देण्याची गरज आहे. ऑनलाइन शिक्षण काळाची गरज आहे, परंतु त्याचा एवढा मोठा भडीमार होत आहे की, मुलांमधील शारीरिक आजार वाढू लागले आहेत. त्यामुळे शिक्षणापासून दूर जात असलेल्या मुलांमधील शिक्षणाची गोडी टिकून राहील आणि ते शाळाबाह्य होणार नाहीत, असेही शिक्षकांनी यावेळी स्पष्ट केले. शिकणे आणि शिकविणे या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असल्याने विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तरांपेक्षाही कृतीयुक्त शिक्षणाची सध्या मोठी गरज असल्याचेही काही शिक्षकांचे म्हणणे आहे. टेक्नोसेव्ही शिक्षक म्हणून प्राथमिक शिक्षकांचा जगभरात नावलौकिक आहे, त्यांना त्यांच्या पद्धतीने मुलांना शिक्षण देण्यास परवानगी मिळावी, अशीही मागणी होत आहे.
प्राथमिक शिक्षक म्हणतात...
शाळा बंद असल्याने वाढले बालविवाह (Child Marriage); शाळाबाह्य विद्यार्थी वाढण्याची भीती
शासनाकडे ऑनलाइन शिक्षणाचा कोणताही कृती आराखडा नाही; ऑनलाइन शिक्षणाचे तोटेच अधिक
अँड्रॉईड मोबाईल आहेत, परंतु रिचार्ज परवडेना; 50 टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांकडे नाहीत मोबाईल
ऑफलाइन शिकविण्याचा सेतू अभ्यासक्रम ऑनलाइन शिकविण्याचे आदेश; वर्षाचा अभ्यासक्रम 45 दिवसांत शिकविणे अशक्यच
दहा-पंधरा मुलांना कोरोनाचे नियम पाळून टप्प्याटप्प्याने ऑफलाइन शिक्षण देण्याची द्यावी परवानगी; मुलांची घसरली गुणवत्ता
राज्यभर ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यासाठी आणखी दहा-बारा वर्षे लागली असती. परंतु, कोरोनाच्या संकटात हा प्रयोग तत्काळ सुरू झाला. मात्र, शासनस्तरावरून त्यासाठीच्या भौतिक सुविधाच मिळाल्या नाहीत. त्यामुळे अनेक अडचणी येत आहेत. पुस्तकांमधील प्रश्नोत्तरांपेक्षाही मुलांना त्यांच्या आवडीचे शिक्षण देण्याची सध्या गरज आहे.
- बाळासाहेब वाघ, प्राथमिक शिक्षक
नव्याने शाळेत येणारा विद्यार्थी शिक्षकांना ओळखत नाहीत. कोरोनात मुलांमधील गुणवत्ता कमी झाली असून ती सुधारण्याचे मोठे आव्हान आहे. कृतीयुक्त शिक्षण घेता आले नसल्याने मुलांमधील लठ्ठपणा वाढला. तर शाळा बंद असल्याने बालविवाह वाढल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मुलांना ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने शिक्षण द्यायला हवे.
- सिद्धाराम माशाळे, प्राथमिक शिक्षक
कोरोनामुळे शाळा बंद ठेवाव्या लागल्या, परंतु ऑनलाइन शिक्षणातून मुलांमधील शिक्षणाची गोडी थोडीशी टिकून राहण्यास मदत झाली. मात्र, ऑनलाइन शिक्षण देताना मुले काहीही पाहतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शारीरिक, मानसिक प्रगती साधण्यासाठी ऑफलाइन शाळा सुरू करण्याची गरज आहे.
- विनोद आगलावे, खासगी प्राथमिक शिक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.