Shinde Canva
सोलापूर

सोन्यासारखी माणसं वाचली पाहिजेत! मुलाच्या समाजकार्यात आईची जमापुंजी

मुलाच्या समाजकार्यासाठी आईने दिली भविष्यासाठी बचत केलेली रक्कम

वसंत कांबळे

कुर्डू (सोलापूर) : कोरोनाच्या (Covid-19) काळात मुलगा धनराज करत असलेली समाजसेवा (Social work) पाहून भारावलेल्या आई शारदा यांनी भविष्यासाठी साठवलेली जमापुंजी सोन्यासारखी माणसं वाचवण्यासाठी देऊन धनराज शिंदेच्या सुरू असलेल्या कार्यास हातभार लावून घराण्याची सामाजिक बांधिलकी जपली आहे. (The amount saved by the mother for the child's social work for the future

कोरोनासारख्या कठीण प्रसंगात मी व माझे कुटुंबीय आपल्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. सगळ्यांनी धीराने या संकटाशी सामना करावा, असे मत माढा वेल्फेअर फाउंडेशनचे संस्थापक- अध्यक्ष धनराज शिंदे यांनी कोरोना काळातील केलेल्या अत्यावश्‍यक मदतीची माहिती देताना मांडले

शिंदे म्हणाले, संपूर्ण जग गेल्या वर्षभरापासून कोरोना रोगाचा सामना करीत आहे. पहिल्यापेक्षा दुसरी लाट ही प्रचंड हानिकारक ठरत आहे. यात आपल्या जवळचे अनेकजण दगावले आहेत. ही परिस्थिती खूप दुर्दैवी व वेदनादायी आहे. आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत असून प्रत्येक रुग्णालयात आवश्‍यक वैद्यकीय उपकरणांची कमतरता जाणवत आहे. माझ्याकडे जशी मागणी येईल तशी उपकरणांची उपलब्धता मी गरजू रुग्णालयांना करून दिली आहे.

अत्याधुनिक मशिन

टेंभुर्णी येथील पाटील हॉस्पिटल, जयश्री हॉस्पिटल, माढ्यातील ग्रामीण रुग्णालय व मित्रप्रेम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांना व्हेंटिलेटर मशिन तसेच आलेगाव, रांझणी, मोडनिंब, माढा, कंदर (ता. करमाळा), करकंब व उंबरे येथील कोव्हिड केअर सेंटर्सना व्हेंटिलेटर्स आणि कुर्डुवाडी येथील साखरे व आधार हॉस्पिटलला ऑक्‍सिजन कॉन्सेन्ट्रेटर मशिन दिल्या आहेत.

रोख रक्कम व इतर

माढा वेल्फेअर फाउंडेशनने लऊळ व कुर्डू येथील लोक सहभागातून उभारण्यात आलेल्या कोव्हिड सेंटरला आर्थिक मदत तसेच काही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये निर्जंतुकीकरण साहित्याचे वाटप केले. रांझणी येथील कोव्हिड सेंटरला इन्व्हर्टरची मदत केली आहे.

या मदतीत धनराज शिंदे यांच्या मातोश्री शारदा शिंदे यांनी स्वतःजवळील बचतीची रक्कम या उपक्रमाला देताना, सोन्यासारख्या माणसांना माझ्या लेखी किंमत असून, त्यांच्या जिवाचे मोल कशातच होऊ शकत नाही, अशा भावना व्यक्त केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT