सोलापूर : कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले, तरीही विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी परीक्षा ही खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट ओसरू लागल्याने बोर्डाने दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी "शाळा तेथे परीक्षेचे उपकेंद्र' असे नियोजन केले. कोरोनात बहुतेक दिवस शाळा बंदच राहिल्याने आणि कोरोनाचा धोका अजूनही टळला नसल्याने बोर्डाने हा पर्याय निवडला आहे. परंतु, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नये, पारदर्शक पध्दतीनेच परीक्षा घ्यावी, अशी अपेक्षा बोर्डाची आहे.
दहावीच्या गुणांवरून विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाची दिशा ठरते, तर बारावीच्या टक्केवारीवरून विद्यार्थ्यांचे भवितव्य निश्चित होते. विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे परीक्षा दिल्यास पुढील शिक्षण डोईजड वाटणार नाही, असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे. अनेकदा परीक्षा सुरू असताना शाळा, महाविद्यालयांमधील काहीजण विद्यार्थ्यांना वस्तूनिष्ठ प्रश्नांची उत्तरे सांगतात. काहीजण कॉपी करून उत्तरे लिहतात. पण, त्या विद्यार्थ्यांची पुढील शैक्षणिक वाटचाल खूपच खडतर राहते. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळा, महाविद्यालयात परीक्षा देण्याची संधी मिळाल्याने त्यांनी प्रमाणिकपणे पेपर सोडवायला हवेत. परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी पूर्वतयारी जोरदार करावी, असे आवाहन शालेय शिक्षण विभागाने केले आहे. जेणेकरून भविष्यातील शिक्षण घेताना कोणतीही अडचण येणार नाही, हा त्यामागील हेतू आहे. बारावीची सोमवारपासून (ता. 14) प्रात्यक्षिक परीक्षा सुरू झाली असून 3 मार्चपर्यंत ही परीक्षा चालेल. त्यानंतर 4 मार्च ते 7 एप्रिल या काळात त्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होईल. तर दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा 25 फेब्रुवारी ते 14 मार्च या काळात आणि त्यानंतर 15 मार्च ते 18 एप्रिलदरम्यान लेखी परीक्षा होईल.
कोरोनामुळे बऱ्याच दिवस शाळा बंद राहिल्या, ऑफलाइन पध्दतीने अभ्यासक्रम शिकविता आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना यंदा पेपर सोडविण्यासाठी 15 ते 30 मिनिटांचा वेळ अधिक दिला आहे. शाळा तेथे परीक्षेचे उपकेंद्र असणार आहे. 15 विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये तशी जवळपास 31 हजार उपकेंद्रे असतील.
- शरद गोसावी, अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
ठळक बाबी...
- कोरोनामुळे विद्यार्थ्यांना ऑफलाइन पध्दतीने शिकता आला नाही अभ्यासक्रम
- 25 टक्के अभ्यासक्रम वगळून उर्वरित अभ्यासक्रमावर तयार झाली प्रश्नपत्रिका
- 40 गुणांचा पेपर सोडविण्यासाठी 15 मिनिटांचा तर 60 व 80 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटांचा वाढीव वेळ
- गावातील शाळेतही (किमान 15 विद्यार्थी) असेल परीक्षेचे उपकेंद्र; बोर्डाला पारदर्शक परीक्षेची अपेक्षा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.