CEO Swamy Canva
सोलापूर

"अभियानांमुळे गावांतील यंत्रणा सक्षम ! घेतली मुख्यमंत्र्यांनी दखल'

"अभियानांमुळे गावांतील यंत्रणा सक्षम ! घेतली मुख्यमंत्र्यांनी दखल'

प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

कोरोनाचा संसर्ग कमी करण्यात अभियानांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.

सोलापूर : कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी जिल्हा परिषदेने अनेक उपाययोजना केल्या. "माझे गाव कोरोनामुक्त गाव', "गाव तिथे कोव्हिड सेंटर', "माझे मूल माझी जबाबदारी' यांसह अनेक अभियान हाती घेतले. या अभियानांच्या माध्यमातून गावातील यंत्रणा सक्षम झाली. गावस्तरावरील समित्या कार्यान्वित झाल्या. राज्यातील इतर जिल्हे कोरोनाच्या संकटाशी अद्यापही झुंजत असताना मात्र सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. कोरोनाच्या लढाईत सुरू केलेल्या अभियानांमुळे गावे कोरोनामुक्त होण्यास मदत झाली. जिल्हा परिषदेने राबविलेल्या अभियानांची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यात अभियानांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (Zilla Parishad Chief Executive Officer Dilip Swamy) यांनी "कॉफी विथ सकाळ'मध्ये (Coffee With Sakal दिली. सहयोगी संपादक अभय दिवाणजी यांनी त्यांचे स्वागत केले. (The Chief Minister took note of the campaigns implemented by Solapur Zilla Parishad CEO Swamy)

आतापर्यंत 43 अभियान

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत दोनवेळा एका गुणाने यश हुकले. 1995 मध्ये मात्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात पाचव्या क्रमांकाने उपजिल्हाधिकारी म्हणून उत्तीर्ण झालो. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे प्रांताधिकारी म्हणून पहिली नियुक्ती मिळाली. लोकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी अभियान राबविण्यावर माझा अधिक भर आहे. आजपर्यंतच्या सेवेत मी 43 अभियाने राबविली. त्यापैकी फक्त दोन अभियाने अपयशी ठरली. बहुतांश अभियानांचे रूपांतर शासन निर्णयात होऊन तो निर्णय राज्यासाठी लागू झाला असल्याची माहिती सीईओ स्वामी यांनी दिली.

सहा महिन्यांत 13 अभियाने !

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सोलापुरात रुजू झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांमध्ये जिल्हा परिषदेत 13 अभियान राबविले. यातील "माझं गाव कोरोनामुक्त गाव' या अभियानामुळे दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी गावे सक्षम झाली. या अभियानाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनीही घेतली. "एक पद, एक झाड' हे अभियान देखील पर्यावरण संवर्धनासाठी लाभदायक असल्याचे सीईओ स्वामी यांनी सांगितले.

राष्ट्रपतींशी संवाद साधण्याची संधी

शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होणारा जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख होती. यवतमाळमधील पुसद विभागात सर्वाधिक आत्महत्या होत होत्या. मी त्या ठिकाणी प्रांताधिकारी म्हणून रुजू झाल्यावर शेतकरी आत्महत्या का करतात? याच्या मुळाशी गेलो. अध्यात्माच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविले. "अर्ज द्या, कर्ज घ्या' अभियानातून शेतकऱ्यांना त्यांच्याच गावात 30 मेच्या आत कर्ज देण्याची व्यवस्था केली. "सज्जा तिथे कार्यालय आणि कार्यालय तेथे तलाठी' अभियान हाती घेतले. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांमध्ये मोठी घट झाली. या अभियानाची दखल तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील (Former President Pratibha Patil) यांनी घेतली. राष्ट्रपती भवनात मला शेतकरी आत्महत्या विषयावर राष्ट्रपतींशी तीस मिनिटे संवाद साधण्याची संधी मिळाली, ही संधी माझ्यासाठी अविस्मरणीय असल्याचेही सीईओ स्वामी यांनी सांगितले.

शिक्षण, आरोग्य विभागात पारदर्शकता

जिल्हा परिषदेतील अनेक शिक्षक विनाकारण मुख्यालयात दिसत होते. शिक्षकांनी पूर्वपरवानगी शिवाय मुख्यालयात येऊ नये, शिक्षकांची कामे वेळेत मार्गी लागावीत यासाठी प्रणाली विकसित केली. वैद्यकीय देयकांसह शिक्षकांच्या पदोन्नती, भत्ते व इतर कामांची गती वाढविली. या प्रक्रियेत पारदर्शकता आणि गतिमानता आणली. त्यामुळे या विभागांमध्ये होणाऱ्या काळ्याबेऱ्या अनेक गोष्टी बंद झाल्याचे सीईओ स्वामी यांनी आवर्जून सांगितले.

शिक्षणाला प्राधान्य

जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्वसामान्यांची मुले शिकतात. त्यामुळे या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे. अनेक शिक्षक स्वत:च्या हक्कासाठी भांडतात. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दल बोलत नाहीत. शिक्षकांचे समुपदेशन केले. विद्यार्थी राहिले तर तुम्ही राहताल, विद्यार्थीच नसतील तर तुमचे काय काम? विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे. कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू झाले. व्हिडिओ करायचा आणि विद्यार्थ्यांना पाठवायचा एवढे केले म्हणजे ऑनलाइन शिक्षण झाले असे नाही. किती विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहिला, त्यांना किती समजले हेदेखील तपासणे महत्त्वाचे असल्याचे श्री. स्वामी म्हणाले.

गावांना प्रोत्साहन देण्यासाठी उपक्रम

कोरोनामुक्तीत चांगले काम केलेल्या गावांचा सन्मान हा झालाच पाहिजे. कोरोनामुक्तीत चांगले काम केलेल्या सरपंचांना मी स्वत: प्रशस्तिपत्र दिले आहे. त्यामुळे केलेल्या कामाचे कौतुक आणि पुढील कामासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या गावांमधील पदाधिकाऱ्यांचा आम्ही त्या गावात जाऊन सन्मान करणार आहोत. महसूल, जिल्हा परिषद, पोलिस प्रशासन या विभागाचे वरिष्ठ अधिकारी गावात जाऊन कोरोनामुक्त गावांचा सन्मान करणार असल्याची माहिती सीईओ स्वामी यांनी दिली.

विधायक कार्याला "सकाळ'ची साथ

माझ्या प्रशासकीय सेवेत मी ज्या-ज्या ठिकाणी गेलो, त्या-त्या ठिकाणी "सकाळ' माध्यम समूहाची मला मोलाची साथ मिळाल्याचे सीईओ स्वामी यांनी सांगितले. "सकाळ'ने भक्कम साथ दिल्याने अनेक कठीण कामे सोपी झाल्याचे ते म्हणाले. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी पुसद येथे काम करत असताना माझ्या अभियानाला सुरवातीला प्रतिसाद मिळत नव्हता. या अभियानाला "सकाळ'ने मोठी प्रसिद्धी दिल्याने या अभियानाला व्यापक प्रतिसाद मिळाला. "साप्ताहिक सकाळ'च्या विशेषांकातही माझ्या कार्याची दखल घेतली गेली. सोलापुरातही सकाळ माध्यम समूहाची मोलाची साथ मिळत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT