तब्बल वीस महिन्यानंतर सुरु झालेल्या शाळांनाही एकाच दिवसात ब्रेक लागला आहे.
करकंब (सोलापूर) : गुरुवारी पहाटेपासून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे एकीकडे शेतीपिकांना मोठा फटका बसला आहे. तब्बल वीस महिन्यानंतर सुरु झालेल्या शाळांनाही एकाच दिवसात ब्रेक लागला आहे.
कोरोनानंतर बुधवारी (ता.01) रोजी जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळा मोठ्या उत्साहात चालू झाल्या. ठिकठिकाणी मिरवणुका काढून, फुग्यांची व फुलांची सजावट करून, रांगोळी काढून, गुलाब पुष्प देऊन व फुलांची उधळण करत विद्यार्थ्यांचे भावपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले होते. घरी बसून ऑनलाइन अभ्यासाला कंटाळलेल्या बालकांनीही स्कुल चले हम म्हणत पुन्हा एकदा नव्याने शाळेचा रस्ता धरला. पण परत उद्या नव्या जोमाने शाळेत जाण्याची स्वप्ने रंगवलेली ही बालके झोपेत असतानाच पहाटे दोन पासून पावसाची संततधार चालू झाली. सकाळ आणि दुपार अशा दोन्ही सत्रातील शाळांची वेळ टळून गेली तरी पावसाने उघडीप दिली नाही. उलट जसजशी शाळेची वेळ जवळ येत गेली तसतसे पावसाचा जोर वाढतच गेला. त्यामुळे पालकांना आपल्या मुलांना शाळेत पाठविणे शक्यच झाले नाही. त्यामुळे एकाच दिवसात अवकाळी पावसामुळे विद्यार्थ्यांच्या शाळेला ब्रेक लागला आणि आदल्याच दिवशी अनुभवलेल्या शाळेतील उत्साहावर पावसाचे पाणी फिरले.
कालपासून शाळा चालू झाल्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पण आज दुसऱ्याच दिवशी पडलेल्या पावसामुळे लोकांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले होते. त्यातच सध्याचे वातावरण आरोग्यदृष्ट्याही घातक असल्याने बहुतांश पालकांनी मुले शाळेत पाठवली नाहीत.
- सर्जेराव सावंत, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, पांढरेवाडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.