anti courpation  solapur
सोलापूर

‘डीडीआर’ कार्यालयातील लिपिक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात! ४००० लाच मागितली, पण कारवाईच्या संशयामुळे घेतली नाही, तरीपण...

‘डीडीआर’ कार्यालयातील वरिष्ठ लिपिक हेमंत नाईकवाडी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी अटक केली. तक्रारदाराला सावकारी दाव्याच्या नकला देण्यासाठी चार हजारांची लाच मागितली होती. पुराव्यांची पडताळणी करून 'लाचलुचप' विभागाने अटकेची कारवाई केली.

सकाळ ऑनलाईन

सोलापूर : जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक हेमंत माडीवाळप्पा नाईकवाडी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (शुक्रवारी) अटक केली. तक्रारदाराला सावकारी दाव्याच्या नकला देण्यासाठी त्याने चार हजारांची लाच मागितली होती. पुराव्यांची पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटकेची कारवाई केली. त्याला उद्या (शनिवारी) न्यायालयात हजर केले जाणार आहे.

दरम्यान, तक्रारदाराविरूद्ध जिल्हा उपनिबंधक कार्यालयात खासगी सावकारीचा दावा सुरु होता. त्याला स्थगिती मिळावी म्हणून तक्रारदाराला मुंबई उच्च न्यायालयात अर्ज द्यायचा होता. त्यासाठी दाव्यातील रोजनाम्याच्या नकला मिळाव्यात म्हणून तक्रारदाराने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे २९ मार्च रोजी अर्ज केला होता. त्या नकला अजूनही मिळाल्या नसल्याने तक्रारदाराने वरिष्ठ लिपिक हेमंत नाईकवाडी याच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यावेळी त्याने चार हजार रुपयांची लाच मागितली.

त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्याने लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे पुराव्यातून सिद्ध झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रकांत कोळी, उमाकांत महाडीक, पोलिस हवालदार शिरीषकुमार सोनवणे, पोलिस नाईक श्रीराम घुगे, श्री. नरोटे, चालक सुरवसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लाच मागितली, पण संशयामुळे स्वीकारली नाही

जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक हेमंत नाईकवाडी याने तक्रारदाराकडे चार हजारांची लाच मागितली. गुरुवारी (ता. २९) त्याला पकडण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला, पण त्याने लाचेची रक्कम त्या दिवशी स्वीकारली नाही. त्याला तक्रारदाराबद्दल संशय आल्याने संशयित आरोपीने लाचेची रक्कम स्वीकारली नसावी, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik : 'या मुन्नाचा भांगसुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही'; खासदार महाडिकांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

जीगर लागतो...! खांद्याला दुखापत, तरीही ऑस्ट्रेलियन खेळाडूने संघासाठी एका हाताने केली फलंदाजी

Waris Pathan: वारिस पठाण पत्रकार परिषद सुरु असतानाच ढसाढसा रडले, म्हणाले, सगळेच माझ्या मागे हात धुवून मागे लागले अन...

मृणाल दुसानिस झाली बिसनेसवूमन! ठाण्यात 'या' ठिकाणी सुरू केलं नवं हॉटेल; पाहा आतून कसं आहे अभिनेत्रीचं 'बेली लाफ्स'

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

SCROLL FOR NEXT