Corona Esakal
सोलापूर

दहा दिवसांत 613 बालके कोरोना पॉझिटिव्ह! होम आयसोलेशनला परवानगी

दहा दिवसांत 613 बालके कोरोना पॉझिटिव्ह ! चिमुकल्यांसाठी होम आयसोलेशनला परवानगी

तात्या लांडगे

मागील दहा दिवसांत ग्रामीण भागात विशेषत: माळशिरस, पंढरपूर, सांगोला, माढा, करमाळा या तालुक्‍यांमध्ये सर्वाधिक बालके पॉझिटिव्ह आली आहेत.

सोलापूर : कोरोनाच्या (Covid-19) पहिल्या लाटेत जिल्ह्यातील साडेचार हजार बालकांना (18 वर्षांखालील) कोरोनाची बाधा झाली होती. मात्र, दुसऱ्या लाटेत ही संख्या दुप्पट झाली असून आतापर्यंत 12 हजारांहून अधिक बालकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात ग्रामीणमधील 11 हजार 886 बालकांचा समावेश आहे. चिंतेची बाब म्हणजे, मागील दहा दिवसांत ग्रामीण भागात विशेषत: माळशिरस (Malshiras), पंढरपूर (Pandharpur), सांगोला (Sangola), माढा (Madha), करमाळा (Karmala) या तालुक्‍यांमध्ये सर्वाधिक बालके पॉझिटिव्ह आली आहेत. (The corona test conducted in the district found 613 children positive in ten days-ssd73)

तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाने (Department of Health) 18 वर्षांखालील मुलांची गावनिहाय तथा शाळानिहाय आरोग्य तपासणी केली. त्यामध्ये जवळपास पाच हजार मुले को-मॉर्बिड (पूर्वीचे गंभीर आजार असलेली मुले) तर 60 पेक्षा जास्त मुलांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. परंतु, कोरोनासदृश लक्षणे असलेल्यांची संख्या पाचशेहून अधिक होती. दरम्यान, आरोग्य विभागाने मागील दहा दिवसांत ग्रामीणमधील किती चिमुकल्यांना कोरोनाची बाधा झाली, याची माहिती संकलित केली आहे. त्यानुसार अवघ्या दहा दिवसांतच ग्रामीणमधील 613 मुले कोरोना बाधित आढळली आहेत. तरीही, चिंता करण्याचे काहीच कारण नसून तिसरी लाट अजूनही आलेली नाही, असा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. मात्र, तिसऱ्या लाटेपूर्वी पालकांनी कोरोना नियमांचे तंतोतंत पालन करावे, प्रतिबंधित लस टोचून घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

जिल्ह्यातील दहा लाख बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये काही बालके कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहेत. बहुतेक बालकांमध्ये काहीच लक्षणे नाहीत, परंतु रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. त्यांच्यावर आरोग्य विभागातील डॉक्‍टरांच्या देखरेखेखाली घरीच उपचार सुरू आहेत.

- दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

दुसऱ्या लाटेतील सद्य:स्थिती

  • कोरोनाबाधित मुले : 6,773

  • कोरोना पॉझिटिव्ह मुली : 5,113

  • एकूण पॉझिटिव्ह : 11,886

  • दहा दिवसांतील पॉझिटिव्ह बालके : 613

चिमुकल्यांवर घरीच उपचार

लहान मुले अधिकवेळ घरातच थांबतात. आजारी असल्यावर ते बाहेर शक्‍यतो पडतच नाहीत. हॉस्पिटल अथवा कोविड केअर सेंटरमध्ये (Covid Care Center) त्यांना ठेवताना त्यांच्यासोबत कोणीतरी पालक ठेवावा लागतो. त्यांचा सतत संपर्क येऊन त्यांनाही धोका होऊ शकतो. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या विशेषत: लक्षणे नसलेल्या मुलांवर त्यांच्या राहत्या घरीच उपचार दिले जाणार आहेत. तर ज्या पॉझिटिव्ह मुलांमध्ये मध्यम अथवा तीव्र स्वरूपाची लक्षणे आढळतात, त्यांच्यावर खासगी तथा शासकीय रुग्णालयात उपचार केले जातील, असेही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (Zilla Parishad Chief Executive Officer Dilip Swamy) यांनी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT