Dharashiv Sugar Factory Canva
सोलापूर

इथेनॉल प्रकल्प बनला ऑक्‍सिजन निर्मितीचे केंद्र ! देशातील पहिलाच प्रोजेक्‍ट

धाराशिव कारखान्यात देशातील पहिला ऑक्‍सिजन निर्मिती प्रकल्प यशस्वी झाला आहे

अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : साखर कारखान्यातील इथेनॉल प्रकल्पात (Ethanol project) आवश्‍यक बदल करून ऑक्‍सिजन निर्मिती (Oxygen Prodution) करण्याचा महाराष्ट्रातील पायलट प्रोजेक्‍ट (Pilot Project) यशस्वी झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील चोरखळी येथील धाराशिव साखर कारखान्यात (Dharashiv Sugar Factory) ऑक्‍सिजन निर्मिती सुरू झाली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार (Senior leader Sharad Pawar) यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पंढरपूर येथील उद्योगपती व कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील (Abhijit Patil) , मौज इंजिनिअरिंगचे संचालक धीरेंद्र ओक, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि प्रशासनाच्या समन्वयामुळे अवघ्या 18 दिवसांत हा पायलट प्रोजेक्‍ट उभारण्यात आला. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रोजेक्‍ट असून तिथे दररोज सहा टन ऑक्‍सिजन निर्मिती होणार आहे. शुद्धता तपासून पुढील दोन, तीन दिवसात रुग्णांना जीवदान देण्यासाठी या कारखान्यातील ऑक्‍सिजनची मदत होणार आहे. (The country's first oxygen production project at Dharashiv sugar factory has been successful)

कोरोनाच्या संकटात दररोज रुग्णांची संख्या वाढू लागल्याने देशभरातील रुग्णालयांतून ऑक्‍सिजनची मागणी वाढली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साखर कारखान्यांना त्यांच्या इथेनॉल प्रकल्पात ऑक्‍सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीचे आवाहन केले होते. त्याची दखल घेऊन पंढरपूरचे यशस्वी उद्योजक, धाराशिव साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी त्यांच्या कारखान्यातील इथेनॉल प्रकल्प बंद ठेवून राज्यातील पायलट प्रोजेक्‍ट राबवण्याची तयारी दर्शवून आवश्‍यक पाठपुरावा केला होता.

श्री. पाटील यांनी या संदर्भात अभ्यास केलेले मौज इंजिनिअरिंगचे श्री. ओक यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. श्री. ओक यांनी पंधरा दिवसात प्रोजेक्‍ट उभारणीची तयारी दर्शवताच श्री. पाटील यांनी तातडीने आवश्‍यक असलेली इक्विपमेंट आणि मटेरियल खरेदीसाठी ऑडर्र दिल्या. परदेशातून विमानाने काही मटेरियल मागवण्यात आले. श्री. ओक, अभिजीत पाटील तसेच त्यांचे बंधू कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील यांनी अहोरात्र धावपळ करून शेकडो रुग्णांचे प्राण वाचवण्यास उपयुक्त ठरणारा हा प्रकल्प उभा करण्यात यश मिळवले आहे. कारखान्यातील ऑक्‍सिजनची शुद्धता 96 टक्के इतकी चांगली आली असून बलूनमधून तो मुंबईतील लॅबकडे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. आवश्‍यक मंजुरी मिळाल्यानंतर या कारखान्यातील ऑक्‍सिजन सिलिंडरमधून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यास सुरुवात होईल.

याबाबत कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील म्हणाले, इथेनॉल प्रोजेक्‍टमध्ये आवश्‍यक बदल करण्यासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च झाले. अमेरिका, चीन, कोरिया येथून विमानाने काही मटेरियल मागवले. राज्यात 137 साखर कारखान्यात इथेनॉल निर्मिती होते. प्रत्येक कारखान्यावर जर पाच टन ऑक्‍सिजन निर्मिती केली गेली तर महाराष्ट्रातील ऑक्‍सिजन मागणी 50 ते 60 टक्के कमी होईल. उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी यांच्या सहकार्यामुळे प्रोजेक्‍ट लवकर उभा राहू शकला.

मौज इंजिनिअरिंगचे श्री. ओक यांनी या विषयी सांगितले की, इथेनॉल प्रकल्पात बदल करून ऑक्‍सिजन निर्मिती शक्‍य असल्याचा आपल्याला विश्वास होता. अभिजित पाटील यांनी तयारी दर्शवली आणि तातडीने निर्णय घेतले. आपल्यासह सुनील कागवाड, संजय बारी, श्री. गुप्ता आणि कारखान्याचे अधिकारी यांनी अहोरात्र काम केले. अन्य काही कारखानेही ऑक्‍सिजन निर्मिती करणार आहेत. मॉलिक्‍युलर स्लीव्हज बनवणारी भारतात एकच कंपनी आहे. त्यांचे उत्पादन मर्यादित असल्याने मॉलिक्‍यूल स्लिव्हज परदेशातून मागवावे लागतील.

ठळक मुद्दे...

  • ऑक्‍सिजन निर्मिती करणारा देशातील पहिला साखर कारखाना

  • इथेनॉल प्रोजेक्‍टमध्ये बदल करण्यासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च

  • केवळ अठरा दिवसांत ऑक्‍सिजन प्लॅंटची उभारणी

  • दररोज सहा टन ऑक्‍सिजन होणार निर्मिती

  • ऑक्‍सिजनची शुद्धता 96 टक्के इतकी चांगली

  • पुढील दोन-तीन दिवसांत रुग्णांसाठी ऑक्‍सिजन पुरवठा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT