Solapur DCC Bank 
सोलापूर

'केशर' दिसेना, 'माती' पहावेना! पुरस्कारप्राप्त 'डीसीसी'चा तिरस्कार

'केशर' दिसेना, 'माती' पहावेना! पुरस्कार मिळवणाऱ्या 'डीसीसी'चा तिरस्कार

प्रमोद बोडके -सकाळ वृत्तसेवा

सोलापूर डीसीसी बॅंकेच्या इतिहासात आणि राजकारणात 'केशरमाती' प्रदर्शन हा विषय अजूनही चर्चेचा, उत्सुकतेचा आणि आरोप-प्रत्यारोपाचा राहिलेला आहे.

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (Solapur District Central Co-operative Bank) इतिहासात आणि राजकारणात 'केशरमाती' प्रदर्शन हा विषय अजूनही चर्चेचा, उत्सुकतेचा आणि आरोप-प्रत्यारोपाचा राहिलेला आहे. 2007 मध्ये तत्कालीन चेअरमन रणजितसिंह मोहिते-पाटील (Ranjitsinh Mohite-Patil) यांच्या काळात पंढरपुरात झालेल्या केशरमाती प्रदर्शनातून जिल्ह्यापुरती असलेली बॅंक राज्यस्तरावर पोहोचली. प्रदर्शन झाले, पुढे काय? केशरमातीतून उगवलेल्या 'केशर'चा शोध अद्यापही सुरु आहे. नंतरच्या काळात शेतकऱ्यांची झालेली माती मात्र स्पष्टपणे दिसत असतानाही पहावत नाही.

केशरमाती प्रदर्शनानंतर म्हणावा तेवढा लाभ शेतकऱ्यांना झाल्याचे दिसत नाही. प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न झाला. परंतु, शेती पिकविण्यासाठी आवश्‍यक असलेल्या पीककर्जाचा तरी पुरवठा नंतरच्या काळात सुरळीत झाला का?, शेतकऱ्यांसाठी असलेली बॅंक साखर कारखानदारांची कधी आणि कशी झाली हे शेतकऱ्यांना समजले. परंतु, त्यात त्यांना फारसे काही करता आले नाही. सोलापुरात सध्या असलेले "डीसीसी'चे मुख्यालय तत्कालीन चेअरमन दिलीप सोपल यांच्या काळात बांधले गेले. बॅंकेच्या जागेवर उभारलेल्या मुख्यालयाच्या खर्चाची तुलना नेहमीच अकलूजच्या "डीसीसी' शाखेबरोरबर होते. अकलूजमध्ये प्रतिसंसद साकारत बांधण्यात आलेल्या "डीसीसी'च्या शाखेची इमारतही व त्यावर झालेला कोट्यावधीचा खर्चही "डीसीसी'च्या राजकारणात आणि अर्थकारणात अद्यापही चर्चेत आहे हे विशेष.

उत्कृष्ट कामगिरीबद्दल एकेकाळी पुरस्कार आणि लाखोंचे बक्षीस घेणारी सोलापूर "डीसीसी' आज कोणत्या स्थितीत आहे. एकेकाळी उत्तम प्रशासन आणि चांगल्या नेतृत्वाच्या जीवावर पुरस्कार मिळविणाऱ्या "डीसीसी'चा आता तिरस्कार सुरु झाला. शेतीसह बिगरशेती कर्जाच्या थकबाकीबद्दल कोणीच अधिकारवाणीने का बोलत नाही.

जिल्ह्याचे राजकारण बदलविणारा काळ

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणासाठी 2002 ते 2010 ही आठ वर्षे खूप महत्वाची आहेत. एकेकाळी चांगले मित्र असलेले आणि जिल्हा बॅंकेत संचालक म्हणून एकत्रित काम केलेले आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार संजय शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या आयुष्यात या आठ वर्षात महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. 2002 मध्ये संजय शिंदे यांचा भोसरे जिल्हा परिषद गटातून पराभव झाला. 2003 मध्ये प्रशांत परिचारक पहिल्यांदा सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे चेअरमन झाले. 2006 मध्ये रणजितसिंह मोहिते-पाटील डीसीसी बॅंकेचे चेअरमन झाले. 2007 मध्ये संजय शिंदे जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी होत जिल्हा परिषद उपाध्यक्ष झाले. 2007 मध्येच करमाळा तालुक्‍यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सोलापूर जिल्ह्यात नवा गट तयार झाला. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत पंढरपूरमधून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचा पराभव झाला. जानेवारी 2010 मध्ये दीपक साळुंखे विधानपरिषदेवर आमदार झाले. 2002 ते 2010 ही आठ वर्षे जिल्ह्याच्या राजकारणाचा टर्निंग पॉईंट ठरली. या राजकारणाचाही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम "डीसीसी'वरही झाल्याचे समोर येते.

अशी होती सोलापूर डीसीसी

  • उत्कृष्ट कार्यप्रणालीबद्दल 2000-2001 मध्ये नाबार्डकडून सन्मान व दीड लाखाचे बक्षीस

  • 1995-96 मध्ये नाबार्डकडून सन्मान व पाच लाखाचे बक्षीस

  • 1995-96, 1996-97 व 2001-2002 साठी महाराष्ट्र स्टेट को. ऑप. बॅंक्‍स असोसिएशनचा पश्‍चिम महाराष्ट्रातील प्रथम पुरस्कार

  • युवकमुद्रा राज्यस्तरीय सहकारी बॅंक स्पर्धेचा पुरस्कार

सोलापूरचा केशर आंबा प्रसिध्द आहे. माणसाला आरोग्यदायी ठेवण्यासाठी केशर महत्वाचे आहे. या हेतून केशरमाती हे नाव या प्रदर्शनाला देण्यात आले होते. या प्रदर्शनासाठी जिल्हा बॅंकेतून फक्त 13 लाख रुपयांचा खर्च झाला आहे. प्रदर्शनासाठी दोन कोटी रुपये त्यावेळी बाहेरुन उभा केले होते. शेतकरी दिवसरात्र शेतात राबतो परंतु, त्याच्या शेतमालाला बाजारपेठ मिळत नाही. कृषी प्रदर्शने मोठ्या शहरांमध्ये होतात. 1975 मध्ये सहकारमहर्षि शंकरराव मोहिते-पाटील यांनी अकलूजमध्ये प्रदर्शन भरविले होते. सोलापूर जिल्ह्यातही भव्य दिव्य कृषी प्रदर्शन असावे याहेतूने 2007 मध्ये पंढरपूरला हे प्रदर्शन भरविण्यात आले. चार दिवसांच्या प्रदर्शनाचा लाभ पाच लाख जणांनी घेतला. मी चेअरमन होण्यापूर्वी "डीसीसी'ला बॅंकिंग परवाना नव्हता. माझ्या काळात तो मिळाला. हा परवाना मिळविण्यासाठी आवश्‍यक असलेले निकष पूर्ण केल्यानेच हा परवाना मिळाला.

- रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी चेअरमन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

Aditya Thackeray Bag : आदित्य ठाकरेंची बॅग तपासली अन् काय सापडलं? व्हिडिओ पाहा

IPL Auction 2025 मधून तब्बल १००० खेळाडूंचा पत्ता कट; आता २०४ जागांसाठी ५७४ खेळाडू रिंगणात; जाणून घ्या तपशील

SCROLL FOR NEXT