सहकार आयुक्तालयाकडून जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू झाली आहे.
सोलापूर : अनियमित कर्जवाटपामुळे 100 वर्षांच्या सोलापूर (Solapur) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर (District Central Co-operative Bank) मे 2018 मध्ये तत्कालीन सरकारने प्रशासक नेमला. त्यानंतर वेगवेगळ्या कालावधीत तीन प्रशासक झाले. विद्यमान प्रशासक शैलेश कोथमिरे (Shailesh Kothmire) यांच्यावर प्रशासकाची जबाबदारी आली आणि त्यांनी बॅंकेचा नावलौकिक पुन्हा मिळवून दिला. त्यांनी 2013 प्रमाणे बॅंकेची आर्थिक परिस्थिती करून दाखविली. या पार्श्वभूमीवर आता नोव्हेंबरमध्ये संचालक मंडळाची निवडणूक होणार असून, मंगळवारपासून (ता. 17) बॅंकेच्या मतदार असलेल्या विकास सोसायट्यांसह अन्य संस्थांकडून ठराव घेतले जाणार आहेत.
सहकार आयुक्तालयाकडून जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू झाली आहे. जिल्हा बॅंकेसाठी एक हजार 265 विकास कार्यकारी सोसायट्या, लेबर फाउंडेशन, पाणीपुरवठा संस्था, दूध संस्था, पगारदार संस्था, पतसंस्था, अर्बन बॅंका, बाजार समिती, सूत गिरणी यांनाही मतदानाचा अधिकार आहे. त्यांच्याकडून 17 ऑगस्टपासून ठराव घेतले जाणार आहेत. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत दोन हजार वैयक्तिक तर जवळपास अडीच हजार संस्थांचे मतदार आहेत. प्रत्येक संस्थेचा एक प्रतिनिधी मतदार म्हणून निवडला जातो. त्यासंबंधीचा ठराव करून पाठविण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला जाणार आहे. त्यानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करून त्यावर हरकती मागविणे आणि त्याचा निपटारा करण्यासाठी साधारणपणे 20 दिवसांचा अवधी दिला जाणार आहे. प्रारूप मतदार यादी तयार झाल्यानंतर पुढील काही दिवसांत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर संचालकपदासाठी इच्छुकांचे अर्ज स्वीकारणे, अर्ज छाननी, अर्ज माघार घेणे, अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे, चिन्ह वाटप आणि मतदान यासाठीही महिन्याचा कालावधी लागणार आहे. प्रशासक कोथमिरे यांचा कार्यकाल डिसेंबर 2021 पर्यंत आहे, परंतु बॅंकेची आर्थिक स्थिती चांगली झाल्याने नोव्हेंबरमध्येच संचालक मंडळाची निवडणूक घेण्याचे नियोजन सहकार विभागाने केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
प्रशासकांच्या योगदानातून सुधारली बॅंक...
ग्राहक अन् बॅंकेच्या कर्मचाऱ्यांमधील मानसिकता बदलली; तयार झाली "आपली बॅंक'ची भावना
राज्यातील अडचणीतील जिल्हा बॅंकांनी नवीन व वाढीव कर्ज सुरूच केले नाही; सोलापूर जिल्हा बॅंकेने करून दाखविले
मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास 104 कोटींचे शेती कर्जवाटप वाढले; नव्या शेतकरी सभासदांना 2013 नंतर मिळाले कर्ज
100 आणि 50 टक्के कर्जवसुली असलेल्या विकास सोसायट्यांना कर्जवाटपाचा मिळाला अधिकार
सी-ग्रेडमधून बॅंक आली बी-ग्रेडवर; रिटेल फायनान्सद्वारे 23 कोटींचे कर्जवाटप करीत बॅंकेने जोडले नवे ग्राहक
बिगरशेतीची थकबाकी झाली कमी; प्रशासकांचे नियोजन अन् कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे बॅंकेच्या व्यवसायात झाली वाढ
2013 नंतर बॅंकेच्या ठेवी कमी होऊन 300 कोटींवर आल्या; आता पुन्हा बॅंकेच्या ठेवी तीन हजार 311 कोटींहून अधिक झाल्या
बॅंकेने सुरू केले गोल्ड लोन; पगारदार नोकरदारांना मिळू लागले मागेल तेवढे वैयक्तिक व गृहकर्ज
बॅंकेने केले सात कोटींचे गोल्ड लोन वाटप; 425 कोटींहून अधिक वैयक्तिक व गृहकर्जाचेही वाटप
नियोजित निवडणूक कार्यक्रम
17 ऑगस्टपासून विकास सोसायट्यांसह मतदार संस्थांकडून ठराव घेणे
सोसायट्या व सहकारी संस्थांच्या ठरावानंतर दीड महिन्याने (15 सप्टेंबरदरम्यान) प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे
प्रारूप मतदार यादीवर हरकती मागवून त्यावर निर्णय देणे (अंदाजित 15 ऑक्टोबरपर्यंत)
प्रारूप मतदार यादी तयार करून अंतिम मतदार यादी ऑक्टोबरअखेरीस प्रसिद्ध करणे
15 नोव्हेंबरनंतर मतदानाची प्रक्रिया सुरू करून नोव्हेंबरअखेरीस नवीन संचालक मंडळ निवडणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.