solapur congress sakal
सोलापूर

जिल्हा रुग्णालय पुढच्या वर्षीच सुरु होणार! फर्निचरच्या कामाला तांत्रिक मान्यतेची प्रतीक्षा; पदभरतीलाही लागणार विलंब; काँग्रेस आक्रमक

दोनशे खाटांचे जिल्हा रुग्णालय अद्याप रुग्णसेवेच्या प्रतीक्षेत आहे. इमारत बांधकाम पूर्ण होऊन आठ-दहा महिने झाले, पण फर्निचरच्या कामामुळे रुग्णालयाच्या उद्‌घाटनाचा मुहूर्त लांबला आहे. ह अर्धवट काम पूर्ण करून पदभरती व्हायला आणखी सहा महिने लागणार आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : दोनशे खाटांचे जिल्हा रुग्णालय अद्याप रुग्णसेवेच्या प्रतीक्षेत आहे. इमारत बांधकाम पूर्ण होऊन आठ-दहा महिने झाले, पण फर्निचरच्या कामामुळे रुग्णालयाच्या उद्‌घाटनाचा मुहूर्त लांबला आहे. ह अर्धवट काम पूर्ण करून पदभरती व्हायला आणखी सहा महिने लागणार आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालय पुढच्या वर्षीच रुग्ण सेवेत येईल, अशी सद्य:स्थिती आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात तीन उपजिल्हा, १४ ग्रामीण रुग्णालये व ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. तसेच ४३१ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे आहेत. मात्र, त्याठिकाणी केवळ प्राथमिक उपचारच होतात, अशी स्थिती आहे. खासगी रुग्णालयातील महागडा उपचार परवडत नसल्याने बहुतेक रुग्णांचा कल सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाकडेच आहे.

महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेतून मोफत उपचार मिळतात, पण योजनेतील रुग्णालयांची संख्या अत्यल्प असल्यानेही रुग्ण ‘सर्वोपचार’मध्येच दाखल होतात. महापालिकेच्या आरोग्य विभागाची स्थितीही अशीच आहे. ही गरज ओळखून जिल्ह्यासाठी १०० खाटा सर्व आजारांच्या रुग्णांसाठी तर १०० खाटा महिला व शिशुसाठी, असे २०० खाटांचे रुग्णालय सोलापुरात झाले. मात्र, पाच वर्षांत हे रुग्णालय पूर्ण होऊ शकले नाही, हे विशेष. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या पुढाकारातून जिल्हा रुग्णालय यावर्षीच सुरु होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काम तातडीने पूर्ण करण्याचे नियोजन

जिल्हा रुग्णालयाचे काम आता बरेच झाले असून तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर काही महिन्यात फर्निचरचेही काम पूर्ण होईल. त्यानंतर पदभरती करावी लागणार आहे. रुग्णालय सुरु व्हायला साधारणत: चार महिने लागतील.

- डॉ. धनंजय पाटील, जिल्हा शल्यचिकीत्सक, सोलापूर

जिल्हा रुग्णालय नसल्यानेच सर्वोपचार रुग्णालयावर भार

श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाची ७६३ रुग्णांची (खाटा) क्षमता आहे. पण, एक हजारांवर रुग्ण त्याठिकाणी नेहमीच असतात. सोलापूरसाठी २०० खाटांचे जिल्हा रुग्णालय २०१९ मध्ये मंजूर झाले. आता इमारत बांधून तयार आहे, पण फर्निचरच्या कामामुळे रुग्णालय सुरु होण्याचा मुहूर्त लांबणीवर पडला आहे. रुग्णालय तातडीने सुरु करावे, अशी मागणी असतानाही अद्याप फर्निचरच्या कामासाठी तांत्रिक मान्यता मिळालेली नाही. पाच वर्षांत हे रुग्णालय सुरु होऊ शकलेले नाही, हे विशेष. ग्रामीण आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्याने आणि जिल्हा रुग्णालय अद्याप सुरु न झाल्याने सध्या ‘सर्वोपचार रुग्णालयावरच भार वाढल्याची वस्तुस्थिती आहे.

जिल्हा रुग्णालय तातडीने सुरु करा; शहर युवक काँग्रेसचे आंदोलन
गुरुनानक चौकातील जिल्हा रुग्णालय तातडीने सुरु करा, अन्यथा महिन्यानंतर पालकमंत्री, आरोग्यमंत्र्यांना सोलापूर शहरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा शहर युवक काँग्रेसने दिला आहे. शुक्रवारी (ता. ६) काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या उपस्थितीत युवक काँग्रेसने नूतन इमारतीसमोर आंदोलन केले. यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या प्रतिमेला गाजराचा हार घालण्यात आला होता. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा कुचकामी असल्याने आणि जिल्हा रुग्णालय सुरु न झाल्याने श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयावर भार पडत असल्याचे युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. क्षमतेपेक्षा अधिक त्याठिकाणी रुग्ण असून त्यांना व्यवस्थित उपचार मिळत नसल्याचेही पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. त्यासाठी जिल्हा रुग्णालय तातडीने सुरु करावे, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. याप्रसंगी महिला शहराध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, जुबेर कुरेशी, विनोद भोसले, भीमाशंकर टेकाळे, श्रीकांत वाडेकर, वाहिद बिजापूरे, महेश लोंढे, बाबूराव म्हेत्रे, तिरुपती परकीपंडला, विवेक कन्ना, सुनील सारंगी, प्रवीण वाले, शरद गुमटे, विवेक इंगळे, रवी आंबेवाले, शंकर अंजनाळकर, हनुमंत सायबोळ्ळु, धीरज खंदारे, समीर काझी, नासिर बंगाली, आदित्य म्हमाणे, मनोहर चकोलेकर, इरफान शेख, महेंद्र शिंदे, शाहु सलगर, यासीन शेख, सरफराज शेख, नासिर शेख, गणेश म्हेत्रे, सायमन गट्टू, सत्यनारायण संगा, जीवक इंगळे, विकी नाईकवाडी, चेतन जंगम, श्याम केंगार, रवी व्हटकर, दीपक खांडेकर, पवन इंगळे, शोभा बोंबे, संध्या काळे, मुमताज शेख, सलिमा शेख, मीराबाई घटकांबळे, भाग्यश्री कदम, लता सोनकांबळे, लता गुंडला, राधा मोरखडे, राणी कांबळे, अंजली विटकर, रुकीया बिराजदार, ज्योती मालतुमकर, नागश्री कांबळे, दिनेश डोंगरे, चंद्रकांत नाईक आदी उपस्थित होते.

आमदार प्रणिती शिंदेंमुळेच रुग्णालय मंजूर
आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून २०१३ मध्ये जिल्हा रुग्णालय मंजूर झाले. वर्षांपूर्वी रुग्णालयाच्या दोन्ही इमारती बांधून तयार आहेत.परंतु, सरकारच्या अनास्थेमुळे फर्निचरच्या कामाला विलंब लागत आहे. रुग्णालय तत्काळ चालू करावे, अन्यथा आरोग्यमंत्री, पालकमंत्र्यांना सोलापूर शहरात पाय ठेवू देणार नाही, असा इशाराही यावेळी युवक काँग्रेसने दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT