शिवरायांनी मुक्काम केलेल्या मंगळवेढ्यातील भुईकोट किल्ल्याची आज दुरवस्था esakal
सोलापूर

शिवरायांनी मुक्काम केलेल्या मंगळवेढ्यातील भुईकोट किल्ल्याची दुरवस्था

शिवरायांनी मुक्काम केलेल्या मंगळवेढ्यातील भुईकोट किल्ल्याची आज दुरवस्था

हुकूम मुलाणी: सकाळ वृत्तसेवा

छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेतील मोहिमेवर जात असताना मंगळवेढ्यात सात दिवस मुक्कामाला थांबले होते.

मंगळवेढा (सोलापूर) : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) दक्षिणेतील मोहिमेवर जात असताना मंगळवेढ्यात (Mangalwedha) सात दिवस मुक्कामाला थांबले होते. या घटनेला सोमवार, 20 डिसेंबर रोजी 356 वर्षे पूर्ण झाली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याची (Historic Bhuikot fort) सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे. किल्ल्याची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने शिवप्रेमी नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. (The fort at Mangalwedha, where Shivaji Maharaj stayed, is falling)

मंगळवेढा परिसरातील ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळांमुळे रत्नागिरी (Ratnagiri) - नागपूर (Nagpur), टेंभुर्णी- विजयपूर या महामार्गामुळे पर्यटनाच्या संधी उपलब्ध होत आहेत. मात्र, पर्यटन खात्याच्या दुर्लक्षामुळे येथील भुईकोट किल्ल्याचे जतन होताना दिसत नाही. मंगळवेढ्यात चालुक्‍य (Chalukya), कलचुरी (Kalchuri) घराण्याची काही काळ राजधानी होती. विजापूरच्या (Vijapur) आदिलशाहीच्या (Adilshahi) जवळकीमुळे नेहमीच हे ठिकाण त्या काळात महत्त्वाचे मानले जात होते. 1665 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंग (Mirza Raje Jaisingh) यांच्यासोबत आदिलशाहीविरुद्ध मोहीम काढली होती. येथील भुईकोट किल्ला व बाहेर 13 बुरूज आणि तटबंदी असल्याने सुरक्षित ठिकाण म्हणून 20 ते 27 डिसेंबर 1665 या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे मुक्काम केला होता.

हा किल्ला विजापूरच्या जवळ होता. तो ताब्यात ठेवणे अवघड असल्यामुळे मिर्झाराजे जयसिंग यांनी दिलेरखानाला किल्ला उद्‌ध्वस्त करण्याची आज्ञा केली होती. पुढील काळात मंगळवेढा पुन्हा आदिलशहाच्या ताब्यात गेला. 1685 मध्ये औरंगजेबच्या बक्षीने उद्‌ध्वस्त झालेला किल्ला ताब्यात घेतला. साधारणत: 200 वर्षांपूर्वी या किल्ल्याची डागडुजी करण्यात आली.

ऐतिहासिक ठेवा जपला पाहिजे

सध्या किल्ल्याचे थोडे अवशेष उरलेले आहेत. अनेक ऐतिहासिक प्राचीन अवशेष गावात विखुरल्याने किल्ल्याचे महत्त्व कमी झाले आहे. आताच्या स्थितीत उभी असलेली वास्तू म्हणजे किल्ले वजा गढी आहे. चार मातीचे बुरुज आहेत. किल्ल्याचा खंदक नष्ट झाला आहे. किल्ल्यात एका कोपऱ्यात काही कोरलेल्या मूर्ती, सप्त मातृकांची मूर्ती, गणपतीची मूर्ती पाहायला मिळतात. किल्ल्याच्या आताच्या अवशेषांवरून किल्ला आता आहे त्यापेक्षा मोठा असल्याचे संकेत मिळतात. परंतु सध्या बुरुजाची पडझड होत असल्याने याकडे दुर्लक्ष केल्यास हा ऐतिहासिक ठेवा पुढच्या पिढीस पाहण्यास मिळणार की नाही, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

हा किल्ला कधी बांधला याची माहिती उपलब्ध होत नाही. मात्र, सध्या किल्ल्याची जबाबदारी राज्य की केद्र शासनाची, हे निश्‍चित करून किल्ल्याची भिंत 13 फूट रूंद असल्याने त्यावर स्लॅब टाकून किल्ला वरून पाहता येईल अशी व्यवस्था करावी. मंगळवेढा तालुक्‍यात विस्कटलेल्या पुरातन मूर्ती एकत्रित जतन केल्यास तालुक्‍याचा इतिहास पुढील पिढीला माहिती होईल.

- अप्पासाहेब पुजारी, इतिहास संशोधक, मंगळवेढा

छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड मानव जातीचे प्रेरणास्थान आहेत. येथील शिव मुक्‍काम दिन मोठ्या दिमाखात साजरा करतात. कारागृह, भूमी अभिलेख, प्रांताधिकारी, सार्वजनिक बांधकाम या कार्यालयांची दुरुस्ती होते, त्याप्रमाणे हा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी प्रशासनाने लक्ष घालावे.

- ज्ञानेश्वर कोंडूभैरी, अध्यक्ष, सार्वजनिक शिवजयंती मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT