या ऑनलाइन सभेपूर्वी बुधवारी दोन सत्रात सदस्यांच्या उपस्थितीत तालुक्यांचा आढावा घेण्यात आला होता. त्यामुळे सदस्यांचे बहुतांश विषय बुधवारीच मार्गी लागले होते.
सोलापूर : पंढरपूर (Pandharpur) जिल्हा करा, या जिल्ह्यात पंढरपूर, सांगोला (Sangola), माळशिरस (Malshiras) व मंगळवेढा (Mangalwedha) या चार तालुक्यांचा समावेश करा, अशी मागणी जिल्हा परिषद (Solapur Zilla Parishad) सदस्य सचिन देशमुख यांनी केली. त्यांच्या या मागणीला जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख यांनी अनुमोदन दिले. जिल्हा परिषदेच्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेत हा ठराव एकमताने मंजूर झाला असल्याची माहिती सदस्य सचिन देशमुख यांनी दिली. (The general meeting of the Zilla Parishad passed a resolution to make Pandharpur a district-ssd73)
सोलापूर जिल्हा परिषदेची ऑनलाइन सर्वसाधारण सभा गुरुवारी झाली. यापूर्वी नियोजित असलेली ऑनलाइन सभा सदस्यांनी गोंधळ घालत तहकूब केली होती. गुरुवारच्या सभेसाठी तालुका पंचायत समित्या व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनात व्यवस्था करण्यात आली होती. या ऑनलाइन सभेपूर्वी बुधवारी दोन सत्रात सदस्यांच्या उपस्थितीत तालुक्यांचा आढावा घेण्यात आला होता. त्यामुळे सदस्यांचे बहुतांश विषय बुधवारीच मार्गी लागले होते. गुरुवारी ऑनलाइन सभेच्या माध्यमातून औपचारिकता पूर्ण झाली.
गुरुवारच्या या सभेमध्ये गोंधळातच 26 विषयांना मंजुरी देण्यात आली. या सभेत बरीच टिंगलटवाळी दिसून आली. अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी एका महिला सभापती यांना बोलूच दिले नाही. आमचा विषय प्रोसिडिंगमध्ये यावा म्हणून त्या ओरडत होत्या. तुम्हाला काल बोलू दिले, आज अजिबात बोलायचे नाही, असे अध्यक्ष कांबळे यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे नेते गैरहजर
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा विरोधी पक्षनेते बळिराम साठे व जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांनी मात्र गुरुवारच्या या ऑनलाइन सभेकडे पाठ फिरविली. ते शेवटपर्यंत जॉईन झाले नाहीत. बुधवारी बैठकीला उपस्थित असलेले सदस्य सुभाष माने यांनी बुधवारच्या आढावा बैठकीतच आपले बरेच प्रश्न सोडवून घेतल्याने ते देखील गुरुवारच्या सभेत दिसले नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.