सोलापूर महापालिकेने शाळा सुरू करण्यासंदर्भातील अंतिम निर्णय अजूनही घेतलेला नाही.
सोलापूर : शहरात आठवी ते बारावीच्या 56 शाळा (Schools) आहेत. तर पहिली ते सातवीच्या 358 शाळा आहेत. या शाळांमध्ये जवळपास दीड लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. राज्य सरकारने पहिलीपासूनच्या सर्व शाळा ऑफलाइन सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु, सोलापूर महापालिकेने (Solapur Municipal Corporation) शाळा सुरू करण्यासंदर्भातील अंतिम निर्णय अजूनही घेतलेला नाही. प्रशासनाधिकारी कादर शेख (Kadar Shaikh) यांनी त्यासंबंधीचा प्रस्ताव महापालिका आयुक्त पी. शिवशंकर (P. Shivshankar) यांना पाठविला असून त्यावर आज (मंगळवारी) निर्णय अपेक्षित आहे. शाळा सुरू होण्यासाठी एक दिवस शिल्लक असतानाही अंतिम निर्णय न झाल्याने शिक्षक संभ्रमात आहेत.
राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर मार्च 2020 पासून बंद असलेल्या पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा ऑफलाइन सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परंतु, दक्षिण आफ्रिकेतील ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढविली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोरोनावरील प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घेण्याचे आवाहन केले जात आहे. ज्या पालकांचे विद्यार्थी शाळेत, महाविद्यालयात जातात, त्यांनी आवर्जून लस घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 18 वर्षांवरील सर्व तरुणांनीही लस टोचून घ्यावी, जेणेकरून कोरोनाचा धोका कमी होईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, शाळा सुरू झाल्यानंतर मुख्याध्यापक, शिक्षकांनी स्वच्छतेला प्राधान्य देत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक महत्त्व द्यावे, असेही प्रशासनाधिकारी कादर शेख यांनी स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, त्याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना जबाबदार धरले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
प्रशासनाधिकारी म्हणाले...
शहरातील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा ऑफलाइन सुरू करण्यासंदर्भात आयुक्तांना दिला प्रस्ताव
शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार शहरातील सर्व शाळा सुरू करता येतील का, अशी केली विचारणा
महापालिका आयुक्तांनी शाळा सुरू करण्याची परवानगी दिल्यास उद्या (बुधवारी) शहरातील सर्व शाळा उघडतील
मुलांची संख्या अधिक असलेल्या शाळांनी पहिली ते चौथी आणि पाचवी ते आठवी, अशा दोन टप्प्यात शाळा सुरू ठेवाव्यात
शिक्षकांसाठी सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाचपर्यंत असेल शाळेची वेळ
दिवसातून तीन ते चार तासच विद्यार्थ्यांची भरेल शाळा; उपस्थितीचे विद्यार्थ्यांना बंधन नाही
विद्यार्थ्यांची सुरक्षितता अन् गुणवत्ता याकडे शिक्षक, मुख्याध्यापकांनी लक्ष द्यावे
आयुक्त पी. शिवशंकर यांच्या निर्णयाची प्रतीक्षा; निर्णयानंतर 1 डिसेंबरपासून सुरू होतील शहरातील शाळा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.