NCP Esakal
सोलापूर

"राष्ट्रवादी'ची सावध पावले ! नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांची तयारी

"राष्ट्रवादी कॉंग्रेस'ची सावध पावले ! नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची तयारी

हुकूम मुलाणी: सकाळ वृत्तसेवा

आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सहानुभूतीची लाट असताना राष्ट्रवादीच्या झालेल्या धक्कादायक पराभवानंतर कार्यकर्त्यांना हा पराभव जिव्हारी लागला आहे.

मंगळवेढा (सोलापूर) : पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालात झालेल्या पराभवानंतर आगामी नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) सावध पावले उचलण्यास सुरवात केली आहे. आमदार भारत भालके (MLA Bharat Bhalke) यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत या मतदारसंघात सहानुभूतीची लाट असताना राष्ट्रवादीच्या झालेल्या धक्कादायक पराभवानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हा पराभव जिव्हारी लागला आहे. आता राज्यात असलेल्या सत्तेचा फायदा घेण्याच्या दृष्टीने आगामी जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादीच्या वर्चस्वासाठी कार्यकर्त्यांना विविध पदांवर संधी देण्याची मागणी होत आहे. (The Nationalist Congress Party is preparing for the municipal and local body elections)

या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन मंडळावर सध्या पक्षनेते अजित जगताप हे कार्यरत असताना नव्याने संधी देताना ही संधी ग्रामीण भागास मिळणे अपेक्षित होते. मात्र, डिसेंबरमध्ये होणाऱ्या नगरपालिकांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी मागासवर्गीय सेलचे विजय खवतोडे यांना जिल्हा नियोजन मंडळावर संधी देत नगरपालिका निवडणुकीची व्यूहरचना करण्यास सुरवात केली आहे. विशेष म्हणजे पोटनिवडणुकीत मंगळवेढा शहरातीन 48 बूथपैकी फक्त तीन बूथवर राष्ट्रवादीला मताधिक्‍य मिळाले आहे. त्यामुळेचे राष्ट्रवादीने शहरावर लक्ष केंद्रित केले आहे. शहरामध्ये महिला आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्षा अनिता नागणे, अजित जगताप, नगरसेवक प्रवीण खवतोडे, विद्यमान नगराध्यक्षा अरुणा माळी यांचे पती सोमनाथ माळी, शहराध्यक्ष मुजम्मिल काझी, शहराध्यक्ष संदीप बुरकुल यांच्या बरोबरीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना मानणारा वर्ग आणि कार्यकर्त्यांच्या बळावर सध्या राष्ट्रवादीचे अस्तित्व टिकून आहे. मात्र, पोटनिवडणुकीत शहरात कमी मतदान मिळाल्यामुळे मोठा धक्का बसला असून, हे मतदानच पराभवाला कारणीभूत ठरले. दरम्यान, घरगुती कारणास्तव अनिता नागणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता शहरात महिलांची मोट बांधण्यासाठी कार्यक्षम नेतृत्वाची आवश्‍यकता आहे.

राष्ट्रवादीचे पुन:श्‍च नगरपालिकेत वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने राज्यात असलेल्या महाविकास आघाडी सरकारचा लाभ घेऊन रखडलेल्या प्रश्नांसाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, भाजपच्या दोन आमदारांसमोर राष्ट्रवादीचा कितपत टिकाव लागणार, हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ग्रामीण भागातील अनेक इच्छुकांना डावलून खवतोडे यांना दिलेली संधी पक्षासाठी कितपत उपयुक्त ठरेल, याचे उत्तर मात्र काळच देणार आहे.

कॉंग्रेस अस्तित्वाच्या शोधात

यापूर्वीची नगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस यांनी एकत्र येत लढविली होती. राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांना कॉंग्रेसमधून संधी देऊन त्यांना विजयी करण्याची किमया स्व. भारत भालके यांनी साधली होती. यंदा तेच कॉंग्रेसचे काही नगरसेवक सध्या भाजपच्या गळाला लागले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सध्या शहरात कॉंग्रेस आपले अस्तित्व शोधण्याच्या मार्गावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT