Homeguard_Police Canva
सोलापूर

एचआरसीटी स्कोअर 18, ऑक्‍सिजन लेव्हल 70 ! होमगार्डसाठी आली खाकी वर्दी धावून

कोरोनाबाधित होमगार्डच्या रक्षणासाठी पोलिस डिपार्टमेंट आली मदतीला

अक्षय गुंड - सकाळ वृत्तसेवा

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : पंढरपूर येथे पोटनिवडणुकीच्या (Pandharpur Assembly By-election) निकालादिवशी कर्तव्य बजावत असताना, वडिलांना कोरोनाची (Covid-19) लागण झाली. एचआरसीटी स्कोअर (HRCT Score) 18 तर ऑक्‍सिजन लेव्हल (Oxygen Level) 70 इतके आले. त्यामुळे प्रकृती खालावली. वेळेवर बेड मिळेना, ना इंजेक्‍शन. त्यात कोरोना महामारीच्या घटना कानावर येत असल्याने समोर सर्वत्र काळोख दिसत होता. अशा संकटात असताना खाकी वर्दीतील माणुसकी (Humanity in khaki uniform) मदतीला धावून आली. पोलिस अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे तातडीने उपचारासाठी सर्व सोयी उपलब्ध झाल्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दररोज आरोग्याची विचारपूस करून मानसिक आधार दिल्याने, सर्वांच्या सहकार्यामुळे या महामारीच्या काळात माझ्या वडिलांचा पुनर्जन्म झाला. कठीण परिस्थितीत कोरोनावर मात केली आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया होमगार्ड (Homeguard) सोमनाथ ढेपे या कर्मचाऱ्याच्या मुलाने "ई-सकाळ'ला दिली. (The police department came to the rescue of the corona positive homeguard)

पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तासाठी पंढरपूर येथे करमाळा तालुक्‍यातील होमगार्ड कर्मचारी सोमनाथ महादेव ढेपे (वय 43) हे गेले होते. त्यांना कोरोनाची लागण झाली. कुटुंबीयांनी तातडीने त्यांच्या उपचारासाठी दवाखान्यात धाव घेतली. एचआरसीटी केली असता स्कोअर 18 इतका आला तर ऑक्‍सिजन पातळी 70 वर व आणखी कमी होत असल्याने, बेड मिळवण्यासाठी कुटुंबीयांची धावपळ सुरू झाली. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. त्यात कुटुंबप्रमुख असलेले ढेपे यांनाच कोरोनाने घेरले. तर दुसरीकडे दिवसेंदिवस राज्यातील कोरोना रुग्णांच्या नवनवीन घटना ऐकायला मिळत असल्याने कुटुंब पूर्णपणे हवालदिल झाले.

अशा कठीण परिस्थितीत खाकी वर्दीतील माणुसकी मदतीला धावून आली. या घटनेची माहिती मिळताच पंढरपूरचे पोलिस उपअधीक्षक विक्रम कदम व पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी स्वतःहून पुढाकार घेत पंढरपुरात बेड व व्हेंटिलेटर उपलब्ध केले. परंतु होमगार्ड ढेपे यांना तत्काळ इंजेक्‍शन व महागड्या गोळ्या- औषधांची गरज होती. यासाठी स्वतः होमगार्डचे जिल्हा समादेशक अतुल झेंडे यांनी अवघ्या दोन तासांत रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची सोय करून दिली. तर पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलिस कल्याण निधीतून महागड्या गोळ्या- औषधांच्या खरेदीसाठी मोठी आर्थिक मदत केली.

अत्यंत नाजूक अशी परिस्थिती असलेल्या होमगार्ड ढेपे यांच्या प्रकृतीबद्दल स्वतः अप्पर पोलिस अधीक्षक तथा होमगार्ड जिल्हा समादेशक अतुल झेंडे व पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे, होमगार्ड कार्यालयातील मोरे, ठाकूर, घाडगे यांनी जातीने लक्ष घालून दैनंदिन माहिती घेऊन, कोरोना आजाराचा सामना करण्यासाठी मानसिक पाठबळ व आधार दिला. एका कर्मचाऱ्याच्या उपचाराच्या खबरदारीसाठी स्वतःहून होमगार्ड जिल्हा समादेशकसह पोलिस प्रशासन एवढी तत्परता दाखवत असल्याने सोमनाथ ढेपे व कुटुंबीयांना मोठा आधार मिळाला. सर्वांच्या मानसिक आधारामुळे व्हेंटिलेटरवर आरोग्याची नाजूक परिस्थिती असताना देखील, होमगार्ड सोमनाथ ढेपे यांनी दहा दिवसांत कोरोनावर मात केली आहे.

सध्या या महामारीच्या काळात नागरिकांना दररोज कित्येक वाईट अनुभवांना सामोरे जावे लागत असताना, अशात एचआरसीटी स्कोअर 18 तर ऑक्‍सिजन 70 असे कोरोनाबाधित असलेल्या होमगार्ड कर्मचाऱ्यासाठी होमगार्ड जिल्हा समादेशक ते सर्व पंढरपूर पोलिस कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न केल्यामुळे होमगार्ड ढेपे यांनी कोरोनावर मात केली आहे. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे नागरिकांमधून कौतुक होत आहे.

कोरोनामुळे वडिलांची परिस्थिती अत्यंत खराब झाली होती. त्यांना तातडीने व्हेंटिलेटरची गरज होती. अशावेळी पंढरपूर पोलिसांची व होमगार्ड जिल्हा समादेशक अतुल झेंडे यांची मोलाची मदत लाभली. या सर्वांनी वडिलांना मानसिक आधार दिल्यामुळेच वडिलांनी लवकर कोरोनावर मात केली. तसेच यांच्या दवाखान्यातील आर्थिक मदतीसाठीही सहकारी झाले. आमच्या ढेपे कुटुंबासाठी मदतीसाठी आलेले हे सर्व देवदूतच आहेत.

- स्वप्नील सोमनाथ ढेपे, करमाळा

पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मोठ्या प्रमाणावर सहकार्य केल्याने, तसेच पंढरपूर पोलिसांनीही होमगार्ड ढेपे यांच्या उपचारासाठी अथक प्रयत्न केल्यामुळे व ढेपे यांनी कोरोना झाल्यानंतर दाखवलेली मानसिक स्थितीही महत्त्वाची होती. त्यामुळे ते लवकर कोरोनामुक्त झाले. पोलिस कर्मचारी व होमगार्ड असा कोणताही दुजाभाव नसतो. पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या होमगार्ड कर्मचाऱ्यांसाठीही आम्ही सदैव तत्पर आहोत.

- अतुल झेंडे, अप्पर पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chetan Tupe won Hadapsar Assembly Election 2024: हडपसरमधील परंपरा मोडत चेतन तुपे यांचा विजय; प्रशांत जगताप यांचा पराभव

UP By Election: उत्तरप्रदेशात सुद्धा भगवे यश! पोटनिवडणुकीत योगींनी लोकसभेचे अपयश धुवून काढले, जाणून घ्या करणे

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: वांद्रे पूर्वमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई विजयी

Nanded Lok Sabha By Election Result 2024 : पोटनिवडणुकीतही काँग्रेसला मोठा झटका; गमावलेली नांदेडची जागा भाजपनं जिंकली

BJP Pravin Datke Won Nagpur Central Election : नागपूर मध्यचा गड भाजपने राखला, भाजपचे प्रवीण दटके 11516 मतांनी विजयी

SCROLL FOR NEXT