दक्षिणमधीबी गटबाजी ! Canva
सोलापूर

दक्षिणमधीबी गटबाजी !

दक्षिणमधीबी गटबाजी !

सकाळ वृत्तसेवा

दक्षिण सोलापूर तालुक्‍याच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी काका अन्‌ नरखेडकरामधी लईच जोरात खेचाखेची सुरू हाय.

सोलापूर : जिल्ह्यातील (Solapur) राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) नेहमीच काय ना कायतरी कारणावरून कलगीतुरा रंगलेला असतुया... मध्यंतरी पालकमंत्री बदलाच्या मागणीनं लईच जोर धरला हुता... थेट मोठ्या सायबाकडं तक्रारी गेल्या हुत्या... जिल्ह्यातील सर्वांनीच इथं सोलापुरात दत्तामामाच्या इरोधात कंबर कसली हुती... आमाला इश्‍वासात न घेता मामाच सगळं डिसीजन घेत्यात असाच तक्रारीचा सूर हुता... हे सगळं समजल्यावर मोठ्या सायबांनी पुण्यात बैठक बोलावली. तवा या इषयावर एकाही नेत्यानं शबुदबी काढला नाय... सोलापुरातल्या पेपरामधी मात्र लईच छापून आलतं... पण परत्यक्षात तिथं कायबी घडलं नाय... काकाची स्थिती मात्र तवा लईच बघण्यासारखी झालती...

आता दक्षिण सोलापूर तालुक्‍याचंबी काय येगळं नाय... दक्षिण सोलापूर तालुक्‍याच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी काका अन्‌ नरखेडकरामधी लईच जोरात खेचाखेची सुरू हाय... काका म्हंत्यात, करजोळेच अध्यक्ष... तर नरखेडकर म्हनत्यात, सुभाष पाटील चांगलं काम करत्यात... त्येच अध्यक्ष... करजोळेच्या निवडीला स्थगिती दिलीया... कुंभारीच्या करजोळे यांची निवड राष्ट्रवादीचे परदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सहमतीनं झाल्याचं काकांचं म्हणणं हाय... पण आधीचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुभाष पाटील यांच्या पाठीशी दस्तुरखुद्द नरखेडकर म्हंजी आपलं ते राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्षच हायती... त्यामुळं आता काका अन्‌ नरखेडकर यांच्यातील लढाईत कोण यशस्वी होतुया ते पहावं लागणार हाय... नरखेडकरांनी दादांच्या वाढदिवसापास्न तालुकानिहाय फिरुन राष्ट्रवादीची जोडणी सुरु केलीया... पक्षाबरुबर सामान्य मानूस जोडण्याची त्यांची ही कला लईच चर्चेत आलीया... त्येंच्यामुळं लोकांच्या प्रश्‍नाबाबतची चर्चा होऊ लागलीया... याच्या यशापयशावर नंतर परिसंवाद हुतील... पण सध्यातरी नरखेडकरांनी आपल्या येगळ्या परकारातून "एक कदम आगे बढो'च केलं हाय...

नरखेडकरांचा जनता दरबार आपापल्या भागात घ्यायचा असा आदेश निघाला हुता... पण दक्षिणच्या करजोळेंनी हा दरबार भरवला नाय... त्ये काकाचं मानूस... काय माहिती त्येंना कुठून आदेश आला हुता... पण हे निमित्त नरखेडकरांना आयतंच मिळालं... त्यातून त्यांनी आपलं अस्त्र भायर काढलं अन्‌ त्येंच्या निवडीला थेट स्थगितीच दिली... पण काकाबी काय कमी मुरब्बी हायती का... त्येंनी अधिकाराचा मुद्दा काढला... त्येंच्याकडं जिल्हाध्यक्षपद हाय... अन्‌ इतकी वरषं राजकारणात राहिलेल्या काकांची काय निस्त उन्हात फिरुन केसं पांढरं झाली नायती... मग त्येंनी फिरुन पुन्हा करजोळेंच्या अध्यक्षपदावर शिक्‍कामोर्तब केलंया... त्यामुळंच कुंभारीत करजोळे यांचा भव्य सत्कार समारंभ झाला...

इतक्‍यावर थांबत्यात ते नरखेडकर कसले? त्येंची ताकदबी काय कमी नाय... पार मोठ्या सायबापासून... दादापासून... ते अध्यक्षापतूर त्येबी पोचलेलं मानूस... त्येंनी बी येगळी फिल्डींग लावली हाय म्हनत्यात... बघू फुढं काय हुतंय त्ये...? पन या एकूणच परकारावरून राष्ट्रवादीतील गटबाजी परत एकदा चर्चेत आलीया... आता नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती अन्‌ महापालिकेच्या निवडणुकीबरुबर जिल्हा बॅंकेचाबी बिगुल वाजू लागलाय... राष्ट्रवादीचं जिल्ह्यातलं वर्चस्व एकीकडं कमी हुत असताना दुसरीकडं ही गटबाजी... इशेष म्हंजी जिल्हाध्यक्षच बदलण्याची परक्रिया राष्ट्रवादीत चालू हाय... हे अन्‌ येगळंच !

- थोरले आबासाहेब

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : मविआचा विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव का झाला? शरद पवार यांनी सांगितली 'ही' कारणं

Sharad Pawar: ''...म्हणून झारखंडची निवडणूक महाराष्ट्रासोबत घेतली'' शरद पवारांनी सांगितलं भाजपच्या विजयामागचं गुपित

Latest Maharashtra News Updates : विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर शरद पवारांची पत्रकार परिषद

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: व्येंकटेश अय्यरव ठरला तिसरा महागडा खेळाडू! जाणून कोणाला किती बोली लागली

Daund Assembly Election 2024 Result : दौंड विधानसभा निवडणुकीत एकाच कुटुंबात विजयाच्या दोन हॅटट्रीक; कुल पिता-पुत्रांसाठी जनादेश

SCROLL FOR NEXT