सेनेचा वाघ गुरगुरतुया, आपल्याच माणसाच्या अंगावर येतुया ! Canva
सोलापूर

सेनेचा वाघ गुरगुरतुया, आपल्याच माणसाच्या अंगावर येतुया !

सेनेचा वाघ गुरगुरतुया, आपल्याच माणसाच्या अंगावर येतुया !

सकाळ वृत्तसेवा

लगा निवडणुकीत इरोधी पारटीच्या माणसासोबत भिडायचं असतंया... पण इथं तर सेनेचा वाघ आपल्याच माणसाच्या अंगावर येऊ लागलंया.

लगा निवडणुकीत इरोधी पारटीच्या माणसासोबत भिडायचं असतंया... पण इथं तर सेनेचा (Shiv Sena) वाघ आपल्याच माणसाच्या अंगावर येऊ लागलंया. बाळासायब (Balasaheb Thackeray) असताना वाघाच्या डरकाळीनं भलभल्यांची टरकायची. सेनेत स्वतःच्याच लोकांबरुबर लढण्याची येळ आता आल्यानं आपलीच माती अन्‌ आपलीच माणसं दिसू लागल्याती... सोलापुरात महेशअण्णाची ताकद पण बरडेसायबात अन्‌ अण्णात इस्तू आडवा जात नव्हता... त्यामुळं अंतर्गत राजकारणाचा बळी सेनेलाच व्हावा लागला... बरडेसायब अन्‌ महेशअण्णांचं थोड व्हतं म्हणून की काय आता मनिषदादाला अन्‌ गणेशदादाचा राडा समोर येऊ लागलंया. मनिषदादाला आपल्याच पक्षातील नेत्यांकडून मिळालेला परसाद बघून लईच वंगाळ वाटू लागलंया... याफुढं तर कसं व्हायचं हेच कळनासं झालंया...

करमाळ्यात आबा निवडून येत होतं, पण अंतर्गत म्हंजी आपलंच नेता वाकावच्या सरांमुळं आबाचं तिकीट कापलं पण आबाबी काय कमी नाय... अपक्ष लढवूनबी त्येंन आपली ताकद दाखवलीच... घड्याळ सोडून हातात बाण घेतलेल्या दीदीला तिकिटाचा कायबी फायदा झालाच नसल्याचं आता कळू लागलयं.. अंतर्गत राजकारणामुळं करमाळ्याचं येणारं सीट गेलं... बार्शीतबी काय येगळं नाय... राजाभौ मूळचं शिवसैनिक पन त्ये अपक्ष लढलं... निवडूनबी आलं... परत्येकयेळी वेगळ्या चिन्हावर निवडणूक लढणाऱ्या वकिलसायबास्नी वाटलं सेनेतून लढलं तर निवडून येऊ... सेना-भाजपची युती व्हती... सोबत दोन-दोन सायब... दोघंबी "ताकदीचं' गडी असून त्येंचा सेनेला काहीएक उपेग झाला नाय... राजाभौला सेनेत असताना अंतर्गत राजकारणाचा सामना करावा लागला हुता... सरांचं गाव असलेल्या माढ्यात सेनेची स्थिती लईच वंगाळ... तिथं ऍडजस्टमेंट केल्याचंच दिसून आलंया... पाणीदार दादासाठी ही जागा बहालच करण्यात आली... हे झालं राजकारणाचं... पण पूर्वीच्या काळात इतर पक्षातील कार्यकर्त्यांबरुबर होणाऱ्या हाणामारीत शिवसैनिकाची अडचण होत हुती...

मोहोळ तालुक्‍यातील शिवसैनिकांना थोड्याथोड्या कालावधीत खुनाचाच सामना करावा लागतुया... पूर्वी झालेल्या शिवसैनिकाच्या खुनाची राज्यभर चर्चा झाली. तर आता दोघा शिवसैनिकांना अपघाताचा बनाव करुनशान खल्लास केलं गेलं... बार्शी तालुक्‍यात तर रक्तरंजीतच निवडणुका झाल्या हा इतिहास... माढा तालुक्‍यातील म्हैसगावमधीबी 1993ला खुनाचा प्रकार झाला हुता... युतीच्या पहिल्या यशायेळी म्हंजी 1995 मधी उत्तर तालुक्‍यात सेना व कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यात खुनापर्यंत परकार झाले. हाणामारी, खून करणारे आपापसातील पै-पाहुण्यातील व्हते... पण राजकारणासाठी त्येंनी एकमेकावर चाल केली.

सोलापुरातील सेनेवर वर्चस्व मिळवण्यासाठी मनिषदादा अन्‌ गणेशदादामधी राजकारण रंगलंय... अंतर्गत धुसफुसीतून त्येंनी एकमेकावर आरोप करायला सुरवात केली. मी मोठा की तू यामधी ही सेना अडकली. यातूनच मनिषदादावर हल्ला झाला... त्येनी गणेशदादावर आरोप केला... इरोधकाशी लढण्याऐवजी ही मंडळी एकमेकावरच हल्ला करु लागली हायती... सत्तेचा महिमाच दुसरं काय?

- थोरले आबासाहेब

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT