शासनाने स्वीकारलेली त्रिसदस्यीय प्रभाग पद्धती छोट्या पक्षांसाठी मारक आहे. ही पद्धत आम्हाला पसंत नाही, असे मत राजेंद्र गवई यांनी व्यक्त केले.
सोलापूर : महापालिकेच्या निवडणुकीत जे पक्ष आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांशी सलोख्याने वागतात, अशा समविचारी पक्षांबरोर आमची आघाडी असेल. शासनाने स्वीकारलेली त्रिसदस्यीय प्रभाग पद्धती छोट्या पक्षांसाठी मारक आहे. ही पद्धत आम्हाला पसंत नाही, असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (Republican Party of India) राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई (Rajendra Gawai) यांनी व्यक्त केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वर्धापनदिनानिमित्त सोलापूर येथे आले असता ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
शासनाने महापालिका निवडणुकांसाठी लागू केलेली त्रिसदस्यीय प्रभाग पद्धत आमच्यासह सर्व छोट्या पक्षांना घातक आहेत. आता शासनाचा निर्णय झालेला आहे. यात बदल होईल असे वाटत नाही, मात्र तरीही हा निर्णय आम्हाला पसंत नाही. मागील वेळी भाजपने स्वत:च्या फायद्यासाठी असा निर्णय घेतला होता. आता महाविकास आघाडीने हा निर्णय का घेतला, हे कळत नाही. महाविकास आघाडीतील घटक अनेक पक्षांना हा निर्णय मान्य नाही. पण माशी कुठे शिंकली हेच कळत नाही, असेही ते म्हणाले.
इम्पिरियल डाटा त्वरित जमा करण्यात यावा. अधिक वेळ न घालवता ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. असाच प्रश्न कनार्टकमध्ये निर्माण झाला होता, मात्र कर्नाटकने दोन महिन्यांत इम्पिरियल डाटा देत हा प्रश्न निकाली काढला. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पन्नास टक्केच्या मर्यादेत वाढ केल्यास मराठा आरक्षण प्रश्नही त्वरित सुटेल, असेही त्यांनी सांगितले.
देगलूरमध्ये अशोक चव्हाण यांना सहकार्य
अमरावती जिल्हा परिषदेची निवडणूक स्वबळावर लढवली जाईल. इतर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व महापालिकेत स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातील. पंढरपूर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या मतदारांमध्ये फूट पडली, यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव झाला होता. याची पुनरावृत्ती नांदेड जिल्ह्यात होऊ नये, यासाठी देगलूर पोटनिवडणुकीत अशोक चव्हाण यांच्यामागे रिपाइंची सर्व शक्ती उभी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.