विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आपत्ती काळात शाळा बंद अथवा सुरू करण्याचा अधिकार मुख्याध्यापकांना देण्यात आला आहे.
सोलापूर : राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. दुसरीकडे, कोरोनाच्या (Covid-19) तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आपत्ती काळात शाळा (School) बंद अथवा सुरू करण्याचा अधिकार मुख्याध्यापकांना देण्यात आला आहे. "माध्यमिक'चे शिक्षणाधिकारी भास्कर बाबर (Secondary Education Officer Bhaskar Babar) यांनी तसा निर्णय घेतला आहे. (The right of the headmaster to start and close the school due to corona and rain-ssd73)
कोरोनामुळे सध्या पहिली ते सावतीपर्यंतच्या शाळा पूर्णपणे बंद आहेत. कोरोनामुक्त गावांमध्ये (एक महिनाभर रुग्ण न आढळलेली गावे) आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. तत्पूर्वी, शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावांची यादी तयार करण्यात आली. निकषांनुसार जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावांमधील 317 शाळा सुरू करण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने केले. सुरवातीला 298 शाळा सुरू झाल्या आणि 50 टक्क्यांच्या उपस्थितीत दोन सत्रात वर्ग भरू लागले. मात्र, सद्य:स्थितीत 238 शाळा सुरू आहेत. त्या शाळांमध्ये दररोज 14 हजार 259 मुलांची उपस्थिती असते, असे माध्यमिक शिक्षण विभागाचे विस्ताराधिकारी अशोक भांजे (Ashok Bhanje, Extension Officer, Secondary Education Department) यांनी सांगितले. कोरोनामुक्त झालेल्या गावांमध्येही रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे शाळा सुरू अथवा बंद करण्यासाठी आता जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज लागणार नाही. शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून मुख्याध्यापक तत्काळ निर्णय घेऊ शकतात, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.
1 सप्टेंबरपासून अकरावीचे वर्ग
सध्या कोरोनामुक्त गावांमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी आहे. परंतु, दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेशासाठी सीईटी द्यावी लागणार आहे. त्यापूर्वी एकाही महाविद्यालयाने कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेश देऊ नये, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने काढले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यातील अकरावीचे वर्ग पूर्णपणे बंद आहेत. सीईटी (CET) परीक्षा 21 ऑगस्टला होणार आहे. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. 1 सप्टेंबरपासून अकरावीचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
नैसर्गिक आपत्ती काळात शाळा बंद अथवा नव्याने सुरू करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑफलाइन शिक्षण द्यायचे, यासंबंधीचा निर्णय मुख्याध्यापक घेऊ शकतात. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन सध्या 238 शाळांमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग सुरू आहेत.
- भास्कर बाबर, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.