वडशिंगे गावात दरोडा! दोन लाखांचा मुद्देमाल लुटला; तिघांना केले जखमी Sakal
सोलापूर

वडशिंगे गावात दरोडा! दोन लाखांचा मुद्देमाल लुटला; तिघांना केले जखमी

वडशिंगे गावात दरोडा! दोन लाखांचा मुद्देमाल लुटला; तिघांना केले जखमी

किरण चव्हाण

वडशिंगे (ता. माढा) येथील स्टॅम्प व्हेंडर सुरेश कदम यांच्या घरावर शनिवारी (ता. 6) पहाटे एक वाजून वीस मिनिटांच्या सुमारास दरोडा पडला.

माढा (सोलापूर) : वडशिंगे (ता. माढा) (Madha Taluka) येथील स्टॅम्प व्हेंडर सुरेश कदम यांच्या घरावर शनिवारी (ता. 6) पहाटे एक वाजून वीस मिनिटांच्या सुमारास दरोडा (Robbery) पडला असून, दरोडेखोरांच्या मारहाणीत सुरेश कदम यांच्यासह त्यांची पत्नी वैशाली, मुलगा रितेश जखमी झाले आहेत. तसेच दोन लाख आठ हजार पाचशे रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी चोरून नेला आहे. ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या फोनमुळे इतर ठिकाणी पडणारे दरोडे टाळता आले; मात्र या दरोड्यामुळे वडशिंगे परिसरात घबराट निर्माण झाली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते (Superintendent of Police Tejaswi Satpute) यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या.

वडशिंगे गावात मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या सुरेश कदम यांच्या घरावर शनिवारी पहाटे एक वाजून वीस मिनिटांच्या सुमारास दरोडेखोरांनी हॉलचा दरवाजा ढकलून व कडी- कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरात प्रवेश करून लाकडी दांडका व लोखंडी पाइपने मारहाण करून मुद्देमालाची दरोडेखोर मागणी करू लागले. दरोडेखोरांनी रोख 90 हजार रुपये, 80 हजार रुपयांचे सोन्याचे गंठण, 16 हजार रुपयांच्या दोन अंगठ्या, 20 हजार रुपयांची फुले व झुबे, दोन हजार रुपयांचे पैंजण, पाचशे रुपयांचे जोडवे असा दोन लाख आठ हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरट्यांनी नेला आहे. याबाबत सुरेश कदम यांनी माढा पोलिसांत फिर्याद दिली आहे.

सुरेश कदम यांच्या घरानंतर निमगाव रोडला असलेल्या श्री. कदम यांच्या घराकडे दरोडेखोरांनी मोर्चा वळवला. मात्र तोपर्यंत ग्रामसुरक्षा दल सतर्क झाले होते. कदम यांच्या घरातील लोक ग्रामसुरक्षा दलाच्या फोनमुळे जागे झाल्याने दरोडेखोरांनी गावातून पळ काढला. पोलिसांनी तातडीने हालचाली करत ठिकठिकाणच्या ग्रामसुरक्षा दलांना सतर्क करत नाकाबंदी केले; मात्र दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही.

माढा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्‍याम बुवा यांनी रात्रीच वडशिंगे गावात दरोडा पडलेल्या घराला भेट देऊन पाहणी केली. श्वानपथक व फिंगरप्रिंट तज्ज्ञांना पाचारण करण्यात आल्याचे श्‍याम बुवा यांनी सांगितले. जखमींवर माढ्यातील पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. वडशिंगे येथील दरोड्याच्या घटनेने या परिसरातील लोकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. वाड्या- वस्त्यांवरील लोकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. ग्रामसुरक्षा दलाच्या स्थापनेमुळे चोरीच्या काही घटना टाळता येत असल्याचेही दिसून आले आहे. याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्‍याम बुवा हे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ज्योती गायकवाड आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT