बनावट खताबाबत विक्रेता व कंपनीची टोलवाटोलवी ! Google
सोलापूर

बनावट खताबाबत विक्रेता व कंपनीची टोलवाटोलवी !

बनावट खताबाबत विक्रेता व कंपनीची टोलवाटोलवी !

सुनील राऊत

नातेपुतेची बाजारपेठ पश्‍चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. परंतु, या बाजारपेठेत बनावट रासायनिक खतांचा सुळसुळाट सुरू आहे.

नातेपुते (सोलापूर) : नातेपुतेची बाजारपेठ पश्‍चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) प्रसिद्ध आहे. परंतु, या बाजारपेठेत बनावट रासायनिक खतांचा (fertilizers) सुळसुळाट सुरू आहे. तालुका कृषी अधिकारी गजानन ननवरे (Taluka Agriculture Officer Gajanan Nanavare) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी येथील नितीन पोपटलाल गांधी यांच्या पोपटलाल मुलुकचंद गांधी या फर्ममधील सूक्ष्म अन्नद्रव्याची महाधन कंपनीच्या खतामध्ये भेसळ असल्या बाबतीत तक्रारी आल्यावरून तपासणी केली असता, मोठ्या प्रमाणात अशी बनावट खते विक्री झालेली आढळून आलेली आहेत. (The seller and the company accuse each other of having fake fertilizer in the Natepute market-ssd73)

प्रत्यक्षात महाधन कंपनीकडून या दुकानदाराने या प्रकारचा मालच खरेदी केलेला नाही. परंतु, विक्री मात्र टनांनी झालेली आहे. नातेपुते बाजारपेठेत (Natepute Market) लगतच्या माण (Maan), इंदापूर (Indapur), बारामती (Baramati), फलटण (Phaltan) तालुक्‍यातील हजारो शेतकरी दररोज खरेदीसाठी येत असतात. नातेपुतेच्या बाजारपेठेत किराणा, कापड, हार्डवेअर, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, फर्निचर आदी वस्तू स्वस्त दरात मिळतात. वाहतुकीचीही मोठी सोय आहे, हे लक्षात घेऊन शेतकरी येथूनच रासायनिक खतांची खरेदी करीत असतात. परंतु सध्या 25 किलोची सूक्ष्म अन्नद्रव्यची गोणी कंपनीचे नाव टाकून बोगस खते विकण्याचे प्रमाण वाढलेले आहे. महाधन कंपनी प्रसिद्ध असून इंदापूर व बारामतीपेक्षा येथे हे खत स्वस्त मिळते, हे कसे शक्‍य आहे? कंपनीच्या खरेदी दरापेक्षा येथे माल कसा स्वस्त मिळतो? यावर सध्या शेतकरी चर्चा करीत आहेत. लाखो रुपये खर्च करून दरवर्षी फळबागांसाठी, द्राक्ष बागांसाठी आणि केळी, उसासाठी या खतांचा शेतकरी वापर करीत आहेत. परंतु दुकानदार मात्र भेसळीचे खत विकून शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत. शासनाने विशेष पथक नेमून नातेपुते, फलटण, अकलूज या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची गोडाउनमधील रासायनिक खतांचे नमुने तपासणीसाठी घेणे गरजेचे आहे.

चढ्या दराने खताची विक्री

नातेपुते बाजारपेठेत युरिया पोते 266 रुपयाला एक व्यापारी विक्री करीत नाहीत. 280 ते 320 रुपये अशी सर्रास विक्री सुरू आहे. तसेच फक्त युरिया मिळत नाही तर सोबतीला दुसरी खते, औषधे खरेदी करण्यासाठी सक्ती केली जाते. कृषी खात्याने भरारी पथके नेमून संपूर्ण बाजारपेठेत लक्ष ठेवणे गरजेचे आहे. खत विक्रेते हे कोट्यधीश असतात. या व्यापाऱ्यांवर कारवाई होऊ नये यासाठी राजकीय नेते, स्थानिक पुढारी कृषी अधिकाऱ्यांना फोनवर सांगत असतात. त्यामुळे अशा प्रवृत्ती अधिक जोमाने बनावट खते विक्री करायला मोकळे सुटतात. हे थांबले पाहिजे. गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे.

नितीन पोपटलाल गांधी यांनी या वर्षीच नव्हे तर मागील वर्षीही एक टनही विद्राव्य खते घेतलेली नाहीत. मात्र, शासकीय तपासणी अहवाल अधिकृतपणाने येत नाही तोपर्यंत हे खत बनावट आहे की नाही हे सांगता येणार नाही. बाहेरच्या जिल्ह्यातून जरी आमच्या कंपनीचे खत आणले तरी जास्तीत जास्त प्रति गोणी शंभर रुपयांचा फरक पडू शकतो. चारशे ते पाचशे रुपये स्वस्त दराने येथे विक्री होते म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. मात्र, अहवाल येईपर्यंत मी ठामपणाने सांगू शकत नाही.

- प्रदीप गुंजाळ, एरिया मॅनेजर, महाधन सोलापूर

मी दरवर्षी महाधन या कंपनीच्या 10 टन खतांची विक्री करीत होतो. ते बंद केले आहे म्हणून हे महाधन कंपनीनेच कुबाड रचले आहे. खत तपासणी होऊन खरे काय ते समजेल.

- नितीन पोपटलाल गांधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील १३१०९ मतांची आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT