Online Education Sakal
सोलापूर

Online Education समजलेच नाही! दहावी-बारावीचे जादा तास सुरू

ऑनलाइन शिकवलेले समजलेच नाही! दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे जादा तास

तात्या लांडगे

दहावीच्या परीक्षेला 25 फेब्रुवारीपासून तर बारावीच्या परीक्षा 14 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत.

सोलापूर : दहावीच्या परीक्षेला 25 फेब्रुवारीपासून तर बारावीच्या परीक्षा (Tenth and twelfth Exam) 14 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांची पूर्वतयारी व्हावी या हेतूने त्यांचे जादा तास घ्यावेत, सुट्टी दिवशीही वर्ग भरवावेत, अशा सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर (Bhaskarrao Babar) यांनी मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. (The students did not understand the study taught by the teacher online)

दहावीचे राज्यभरातून 15 लाख 27 हजार 761 तर बारावीचे 14 लाख 26 हजार 980 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. कोरोना (Covid-19) आणि ओमिक्रॉनच्या (Omicron) पार्श्‍वभूमीवर दोन्ही विद्यार्थ्यांच्या परीक्षा एकाच दिवशी नव्हे तर स्वतंत्रपणे होणार आहेत. दरवर्षीप्रमाणे एका बेंचवर दहावी व बारावीचे दोन्ही विद्यार्थी बसणार नाहीत, असे शालेय शिक्षण विभागाने (Department of School Education) स्पष्ट केले आहे. 18 वर्षांवरील सर्व परीक्षार्थींनी प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस (Covid Vaccine) टोचायला हवेत. तत्पूर्वी, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शाळा (School) बंद राहिल्याने दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन धडे (Online Education) देण्यात आले. पुन्हा शाळा सुरू होणार नाहीत म्हणून अनेकांनी ऑनलाइन पद्धतीनेच अभ्यास संपवला. परंतु, 23 नोव्हेंबरपासून ऑफलाइन शाळा (Offline Education) सुरू झाल्या. तत्पूर्वी, बहुतेक महाविद्यालयांनी त्यांचा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण केला होता. परंतु, विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासक्रम समजलाच नाही, त्यामुळे त्यांना आता तेच घटक पुन्हा ऑफलाइन पद्धतीने शिकवले जात आहेत. काही शाळा परीक्षेपूर्वी घटक चाचण्या घेत आहेत; तरीही परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन शिक्षणाधिकाऱ्यांनी केले आहे.

दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम शिक्षकांनी शिकवून पूर्ण केला आहे. शाळा बंद असताना शिक्षकांकडून ऑनलाइन तर आता ऑफलाइन अध्यापन केले जात आहे. तरीही, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक, परीक्षेच्या तयारीसाठी घटक चाचण्यांसाठी सर्व शाळा जादा तास अथवा सुट्टीतही त्या मुलांचे वर्ग भरवू शकतात.

- भास्करराव बाबर, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

पूर्वपरीक्षेचे नियोजन नाहीच

बोर्डाच्या परीक्षेपूर्वी (Board Exams) मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांची पूर्वपरीक्षा (Pre-Examination) घेतली जाते. गुणवत्ता वाढावी, विद्यार्थ्यांचे टेन्शन कमी व्हावे हा त्यामागील हेतू असतो. मात्र, मुख्याध्यापक संघातर्फे ही पूर्वपरीक्षा नेमकी कधी होणार, या संभ्रमात मुख्याध्यापक सापडले आहेत. ऑनलाइन पद्धतीने शिकवलेला अभ्यासक्रम आता शिक्षक ऑफलाइन शिकवून पूर्ण करीत आहेत. त्यामुळे या परीक्षा कधीपासून सुरू होतील, यासंदर्भात अजूनही मुख्याध्यापक संघाने भूमिका स्पष्ट केलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT