कलवरी ऑर्केस्ट्रा बार प्रकरण : दोघांना पोलिस कोठडी; बार मालक फरार Canva
सोलापूर

कलवरी ऑर्केस्ट्रा बार प्रकरण : दोघांना पोलिस कोठडी; बार मालक फरार

कलवरी ऑर्केस्ट्रा बार प्रकरण : दोघांना पोलिस कोठडी; बार मालक फरार

प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

कोरोना नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या कलवरी आर्केस्ट्रा बारवर विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने मोठी कारवाई केली.

सोलापूर : विजापूर रोडवरील हत्तूर हद्दीत कोरोनाच्या (Covid-19) नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या कलवरी आर्केस्ट्रा बारवर विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या (Vijapur Naka Police Station, Solapur) डीबी पथकाने मोठी कारवाई केली आहे. या वेळी कलवरी ऑर्केस्ट्रा बार येथे महिला नृत्यांगना अंगात तोकडे कपडे घालून संगीताच्या तालावर ग्राहकांबरोबर अश्‍लील हावभाव करत असल्याचे आढळून आले. या कारवाईत दहा जणांना ताब्यात घेतले होते. त्यापैकी दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी 27 लाख 89 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. दरम्यान, बार मालक अद्यापही फरार असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दहा जणांवर विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल झाला आहे.

यातील वैभव दत्तात्रय माळशिकारे (रा. वडकबाळ, ता. दक्षिण सोलापूर) व अजय चंद्रकांत क्षीरसागर (रा. बुधवार पेठ, सोलापूर) यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी महेश राचप्पा अंदानी (रा. गोकाक, बेळगाव), मल्लिकार्जुन चनबसप्पा कुंभार ऊर्फ हच्चीनाळ (रा. जमखंडी, जि. बागलकोट), प्रवीण बसवराज औराधी (रा. शांतिनिकेतन एरिया, महालिंगपूर), गुरुराज काडप्पा हलकरनी (रा. रबकोई बनहट्टी, जि. बागलकोट), विलास विश्वनाथ हिरेमठ (रा. जमखंडी, जि. बागलकोट), रोहित पांडुरंग चव्हाण (रा. माशाळ नगर, विजयपूर रोड, सोलापूर), नागेश तमन्ना जाधव (रा. सेटलमेंट, सोलापूर) यांच्यासह एका नृत्यांगनावर गुन्हा दाखल झाला आहे.

कलवरी ऑर्केस्ट्रा बार येथे महिला नृत्यांगना अंगात तोकडे कपडे घालून संगीताच्या तालावर ग्राहकांबरोबर अश्‍लील हावभाव करत असल्याचे आढळून आले. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून सार्वजनिक आरोग्य धोक्‍यात आणल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Mahad Assembly Election 2024 result live : महाड विधानसभेत भरत गोगावलेंची सरशी ! ठाकरे गटाच्या स्नेहल जगतापांचा दणदणीत पराभव

Konkan Region Assembly Election Result 2024: राणे बंधूंनी तळकोकण राखले; भास्कर जाधव यांनी थोडक्यात गुहागर जिंकले

Sanjay Gaikwad won Buldana Vidhan Sabha: दोन शिवसेनेत कडवी झुंज! संजय गायकवाडांचा निसटता विजय, उद्धवसेनेच्या जयश्रींनीची तगडी फाईट

SCROLL FOR NEXT