मध्यंतरी पुणे जिल्हा व परिसर तसेच धरण साखळी परिसरात झालेल्या पावसामुळे 60 टक्क्यांवर गेलेले उजनी धरण हळूहळू 84.13 टक्क्यांवर आले आहे.
केत्तूर (सोलापूर) : मध्यंतरी पुणे (Pune) जिल्हा व परिसर तसेच धरण साखळी परिसरात झालेल्या पावसामुळे 60 टक्क्यांवर गेलेले उजनी धरण (Ujani Dam) हळूहळू 84.13 टक्क्यांवर आले आहे. परंतु पुन्हा एकदा पावसाने ब्रेक घेतल्याने पाण्याचा साठा गेल्या दोन दिवसांत 84.13 टक्क्यांवरच रेंगाळला आहे. उजनीत येणारा विसर्गही कमी झाल्याने परतीचा पाऊस काय करामत करतो व उजनी धरण पूर्ण क्षमतेने 100 टक्के भरते का नाही? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
नेहमीप्रमाणे पुणे जिल्ह्यातील धरण पट्ट्यात झालेल्या पावसाच्या बळावरच उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत होती; परंतु तेथेही सध्या पाऊस थांबल्याने उजनीची पाणी पातळी 83 टक्क्यांवर येऊन थांबली आहे. ती अद्यापही शतकापासून अजून 16 पावले दूर आहे. सध्या पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पानशेत, पवना, आंध्रा, टेमघर, भाटघर, वीर, गुंजवणे आदी धरणांनी 100 टक्के पार केली आहेत.
राज्यातील सर्वांत मोठे समजले जाणारे तसेच सोलापूरसह पुणे व नगर जिल्ह्यासाठी वरदायिनी असणारे उजनी धरण ऑगस्टमध्येच पूर्ण क्षमतेने भरते. गतवर्षी ते 15 ऑगस्टला शंभर टक्के भरले होते, तर दिवाळीतही पाऊस सुरूच असल्याने ते ओव्हर फ्लो झाले होते. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरणे गरजेचे आहे. गतवर्षी 11 टक्के पाणीसाठा होऊनही उन्हाळ्याच्या टप्प्यात ते मायनस 23 टक्क्यांवर गेले होते. यापुढेही उजनी धरण पूर्ण क्षमतेने 100 टक्के न भरल्यास पाण्याचे नियोजन करणे परीक्षेचे ठरणार आहे; तसेच लाभ क्षेत्रातील पिकांनाही पाण्याची टंचाई जाणवणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा 111.62 टीएमसी एवढा असून, मृतसाठा 63.66 टीएमसी इतका आहे.
उजनीची सध्याची परिस्थिती
एकूण पाणी पातळी : 496.0690 मीटर
एकूण पाणीसाठा : 3079.15 मीटर (108.29 टीएमसी)
उपयुक्त पाणीसाठा :1276.34 (44.74 टीएमसी)
टक्केवारी : 84.13
उजनीत येणारा विसर्ग
दौंड : 7234 क्युसेक
बंडगार्डन : 9720 क्युसेक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.