पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ Sakal
सोलापूर

आगामी सत्र परीक्षा ऑफलाइनच? विद्यापीठाचे वाढणार परीक्षा शुल्क

आगामी सत्र परीक्षा ऑफलाइनच? विद्यापीठाचे 10 टक्‍क्‍यांनी वाढणार परीक्षा शुल्क

तात्या लांडगे

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने यंदा 10 टक्‍के परीक्षा शुल्क वाढविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

सोलापूर : विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क व परीक्षा शुल्कातूनच विद्यापीठाचा खर्च भागविला जातो. आता खर्च वाढला असून परीक्षा व प्रवेश शुल्काची रक्‍कम अपुरी पडू लागल्याचा सूर आहे. मागील तीन वर्षात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने (Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University) परीक्षा शुल्कात वाढ केली नाही. त्यामुळे यंदा 10 टक्‍के परीक्षा शुल्क वाढविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठांतर्गत सद्य:स्थितीत 98 महाविद्यालये आहेत. 111 महाविद्यालयांपैकी अभियांत्रिकीची काही महाविद्यालये "बाटू'शी जोडली गेली आहेत. त्यामुळे सोलापूर विद्यापीठाअंतर्गत आता दरवर्षी 68 ते 69 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांच्या परीक्षा शुल्कातून विद्यापीठाला साडेचार ते पावणेपाच कोटी रुपये मिळतात. त्यातील बहुतेक खर्च प्रश्‍नपत्रिका, उत्तरपत्रिकांवरच खर्च केला जातो. दरम्यान, परीक्षेनंतर ज्यांना प्राप्त गुणाबद्दल साशंकता आहे, त्यांना उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी दिली जाते. मात्र, कोरोनामुळे मागील काही सत्र परीक्षेत हा प्रकार बंद झाल्यानेही विद्यापीठाला रक्‍कम मिळालेली नाही. अनेक खर्चात विद्यापीठाने काटकसर केल्याचेही बोलले जात आहे. ऑक्‍टोबर 2020 मधील परीक्षेपूर्वीच परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय विचाराधीन होता. त्यानंतर जानेवारी, मार्च, जुलै 2021 मध्ये परीक्षा पार पडल्या. परंतु, कोरोनामुळे विद्यापीठाने विद्यार्थी हित पाहत तो प्रस्ताव तूर्तास मागे घेतला. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. त्यामुळे परीक्षा शुल्क वाढीचा प्रस्ताव पुन्हा ठेवण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.

आगामी परीक्षा ऑफलाइनच?

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर सर्व निर्बंध शिथिल केले असून दैनंदिन कामकाज पूर्ववत होत आहे. कोरोना काळात ऑनलाइन परीक्षा पार पडल्या, परंतु त्यात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा कस न लागताच परीक्षा पार पडल्या. या परीक्षांमध्ये अनेक चुकीचे प्रकार पहायला मिळाले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेशी तडजोड नको, जागतिक स्पर्धेत आपल्या विद्यापीठाचे नाणे खणखणीत वाजायला हवे, या हेतूने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणारी आगामी सत्र परीक्षा ऑफलाइनच होईल. तरीही, त्यावेळची कोरोनाची परिस्थिती पाहून अंतिम निर्णय होणार असल्याचेही विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.

विद्यापीठाची सद्य:स्थिती...

  • अंतर्गत महाविद्यालये : 98

  • अंदाजित एकूण विद्यार्थी : 68,000

  • जमा होणारे परीक्षा शुल्क : 4.73 कोटी

  • दहा टक्‍के वाढीनुसार शुल्क : 47,00000

विद्यार्थ्यांच्या अडचणींचा विचार करून विद्यापीठाने मागील तीन वर्षांत एकदाही परीक्षा शुल्क वाढविले नाही. यंदा दहा टक्‍के वाढ करण्याचा प्रस्ताव असून त्यावर लवकरच अंतिम निर्णय होईल.

- शिवकुमार गणापूर, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICSE, ISC Exam Schedule: दहावी, बारावी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर; 'असं' डाऊनलोड करा

IPL 2025 Mega Auction Live Streaming: अर्जुन तेंडुलकर आता मुंबई इंडियन्सला नकोसा झाला, ३० लाखांतही कोणी बोली नाही लावली

Koregaon Bhima News : कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर उद्या अंतिम युक्तिवाद

Porsche Car Accident : आरोपींच्या विरोधात आरोप निश्चित करण्याचा अर्ज दाखल

Vaibhav Suryavanshi IPL Auction: नावातच 'वैभव'! १३ व्या वर्षी सूर्यवंशी झाला करोडपती; द्रविडच्या मार्गदर्शनाखाली RR कडून खेळणार

SCROLL FOR NEXT