crime news esakal
सोलापूर

Solapur News : पापरी येथे तीन लाखाची चोरी; परिसरात घबराट

राजकुमार शहा

मोहोळ : स्वयंपाक घराचा दरवाजा उघडून आज प्रवेश करून आतील लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐकून दोन लाख 93 हजार 500 रुपयाचा ऐवज चोरून नेल्याची घटना सोमवार ता 13 रोजी रात्री दीड वाजता पापरी ता मोहोळ येथे घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, पापरी येथील संजय मधुकर गायकवाड हे शेती व्यवसाय करतात. उन्हाळ्याचे दिवस असल्याने व उकाड्यामुळे संजय व त्यांची पत्नी रात्री बारा वाजे पर्यंत गप्पा मारत बसले होते. दरम्यान संजय हे घराचे समोर अंगणात कॉटवर झोपले, तर पत्नी घराचा मुख्य दरवाजा व स्वयंपाक घराचा दरवाजा पुढे करून गच्चीवर जाऊन झोपली. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास संजय गायकवाड यांना डास चावू लागल्याने ते जागे झाले व घरातील मुख्य दरवाजा उघडून बेडरूम मध्ये गेले.

त्यावेळी त्यांना बेडरूम मधील कपाट उघडे दिसले. त्यांनी ही घटना पत्नीला तात्काळ गच्चीवर जाऊन सांगितली. त्यावेळी दोघांनी खाली येऊन पाहिले असता कपाटातील चार तोळे सोन्याचे मोठे पदक असलेले गंठण, एक लहान गंठण, डोरले, मनी व कानातील फुले झुबे, व रोख रक्कम 38 हजार 500 असा एकूण दोन लाख 93 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला या घटने बाबत संजय मधुकर गायकवाड रा पापरी यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक साने करीत आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT