पुन्हा बारामतीचे पोलिस तपासकामी भोसले याच्याविरुद्ध पोलिस कोठडी मागण्याची शक्यता आहे. यातील अन्य आरोपी अद्याप फरार आहेत. ते कारण पोलिसांसाठी महत्त्वाचे आहे.
करमाळा (सोलापूर) : उंदरगाव (ता. करमाळा) (Undargaon, Taluka Karmala) येथील मनोहर भोसलेला (Manohar Bhosle) अटक केल्यानंतर बारामती पोलिसांनी (Baramati Police) न्यायालयात हजर केले होते. (Crime) बारामती न्यायालयाने त्यास पाच दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे. त्यानंतर पुन्हा बारामतीचे पोलिस तपासकामी भोसले याच्याविरुद्ध पोलिस कोठडी मागण्याची शक्यता आहे. यातील अन्य आरोपी अद्याप फरार आहेत. ते कारण पोलिसांसाठी महत्त्वाचे आहे. दरम्यान, जेव्हा भोसले यास न्यायालयीन कोठडी मिळेल. त्यामुळे मनोहर भोसले करमाळा पोलिसांच्या (Karmala Police) ताब्यात कधी मिळणार, याची उत्सुकता लागली आहे.
मनोहर भोसले विरुद्ध सोलापूर येथे 8 सप्टेंबरला रात्री तर करमाळ्यात 9 सप्टेंबरला पहाटे गुन्हा दाखल झाला. त्यानंतर दुपारी बारामती पोलिसांनी गुन्हा दाखल केला. असे असले तरी 10 सप्टेंबरला पुणे एलसीबी पोलिसांनी मनोहर भोसलेला सातारा जिल्ह्यातून अटक केली. पुणे पोलिसांनी पकडल्याने अर्थातच भोसले याचा ताबा बारामती पोलिसांनी घेतला. बारामती पोलिसांनी त्यास तत्काळ न्यायालयात हजर केले असता, भोसलेला पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. त्यानंतर बारामती पोलिसांना पुन्हा पोलिस कोठडी वाढवून मिळाली नाही तर भोसलेचा ताबा तत्काळ करमाळा पोलिसांना बारामती न्यायालयातून मिळेल. बारामती न्यायालयाच्या निर्णयाकडे करमाळा पोलिसांचे लक्ष वेधले आहे.
भाजीपाला विकणारा रातोरात झाला मनोहरमामा!
स्वतःला बाळूमामांचा अवतार समजणारा मनोहरमामा भोसले या भोंदूला 10 सप्टेंबर रोजी लोणंद, जि. सातारा येथील एका फार्महाउसवर पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले. लोकांची दिशाभूल करणे, फसवणूक, बलात्कार यांसह त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. तत्पूर्वी डीएड करूनही नोकरी मिळत नसल्याने त्याने आसपासच्या गावांत भाजीपाला, सुकट- बोंबील विकून गुजराण करण्यास सुरवात केली. मात्र, एके दिवशी आपल्याला बाळूमामाचा साक्षात्कार झाला आहे, असे सांगून हा मनोहर रातोरात मनोहरमामा झाला. बाळूमामानंतर मनोहरमामा एक दैवी शक्ती आहे, असे भासवून गर्दी जमविण्यास यशस्वी झाला.
मनोहर भोसले याचे मूळगाव हे इंदापूर (जि. पुणे) तालुक्यातील अंथुर्णे. त्याचे आईवडील हे उदरनिर्वाहासाठी इंदापूर तालुक्यातून करमाळा (जि. सोलापूर) तालुक्यातील उंदरगाव येथे आले होते. मनोहर भोसले याचे प्राथमिक शिक्षण हे उंदरगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झालेले आहे, तर माध्यमिक शिक्षण राजुरीतील राजेश्वर विद्यालयात झाले. पुढे डीएडची पदवी घेतल्यानंतरही कोठेच नोकरी मिळत नाही म्हटल्यानंतर सुरवातीच्या काळात तो उंदरगाव, मांजरगाव, उमरड, सोगाव, रिटेवाडी, राजुरी परिसरात भाजीपाला आणि सुकट बोंबील विकण्याचे काम करत होता.
आपल्याला बाळूमामा प्रसन्न झाले आहेत, असे एके दिवशी सांगून मनोहर याने उंदरगावच्या कांबळे वस्तीत बाळूमामांच्या नावानं लोकांचे भविष्य पाहण्यास सुरुवात केली. मात्र, तेथील लोकांशी मतभेद झाल्याने त्याने हा उद्योग आता उभारलेल्या मठाशेजारीला एका शेतात सुरू केला. एका अमावस्याच्या दिवशी "आपणाला बाळूमामांचा साक्षात्कार झाला असून, या ठिकाणी खोदा' असे सांगितले. त्या ठिकाणी आधीच पुरून ठेवलेले भंडारा आणि खोबरं निघाले, असे परिसरातील लोक सांगतात. अगदी सुरुवातीच्या काळात उंदरगाव, मांजरगाव, उमरड, राजुरी, सोगाव, वाशिंबे, पोंधवडी या परिसरातील अनेक लोक आपल्या समस्या घेऊन त्याच्याकडे जात असत.
उंदरगाव येथील वस्तीवर सुरवातीला दोन-तीन लोक अमावास्येला त्याच्याकडे जात असे. त्यानंतर त्याने आपला मठ वस्तीजवळील शेतात सुरू केला. तेथे प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील गिरीम येथे काही दिवस हाच उद्योग केला. तेथे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर त्याने आपला मोर्चा बारामती तालुक्यातील गोजुबावीकडे वळविला. मात्र, आपले दुकान कोठेच चालत नाही म्हटल्यावर त्याने अखेर उंदरगाव येथील मठाचे काम सुरू केले. उंदरगाव येथे मात्र त्याचे प्रस्थ वाढत गेले आणि मनोहरने आपले बस्तान बसविले.
मठात येणाऱ्या नागरिकांकडे मनोहर भोसलेचे आईवडील आणि त्याचे नातेवाईक बाळूमामाला ओवाळणी टाका, असा आग्रह करायचे. त्यानुसार कोणी दहा रुपये, कोणी वीस रुपयांची नोट टाकायला लागले तर त्यांना पाचशेची, हजाराची, दोन हजाराची नोट टाका, असे सांगायचे. उंदरगावमध्ये बाळूमामांचा साक्षात्कार झालेला महाराज आहे; म्हणून या भागातील लोकांनी मनोहरच्या मठाकडे धावा सुरू केला. मात्र, अनेक वाऱ्या केल्यानंतरही कोणताच फरक पडत नाही, हे लक्षात आल्यानंतर परिसरातील लोकांचा त्याच्याकडील ओढा कमी झाला. पण, बाहेरून येणाऱ्या लोकांची गर्दी वाढली.
स्थानिक लोकांची गर्दी कमी झाली असली तरी दुसरीकडे मनोहरकडे शहरांमधून येणाऱ्या लोकांचा ओढा वाढत गेला. डीएडचे शिक्षण झालेल्या मनोहरने बघता बघता शहरी आणि बड्या लोकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. येथील मनोहरमामाच्या मठात अनेक राजकीय नेते, अधिकारी आपले भविष्य पाहण्यासाठी येत असत. बहुतांश दिग्गज लोक रात्रीच्या वेळीच मठात येऊन जात. राज्यातील मंत्री, बडे नेते, अधिकारी यांचा राबता मनोहरच्या मठात वाढत गेला, त्यामुळे लोकांचा विश्वास वाढत गेला आणि गर्दी जमत गेली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.