कोरोनाचा धोका अजूनही टळला नसल्याने उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व पोलिस अधीक्षक नीवा जैन यांनी 18 ते 20 ऑक्टोबरदरम्यान जिल्हाबंदी जाहीर केली आहे.
सोलापूर : कोजागरी पौर्णिमेनिमित्त (Kojagari Pournima) श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवासाठी (Navratri Festival, Tuljapur) लाखो भाविक दर्शनासाठी पायी चालत जाण्याची परंपरा आहे. मात्र, कोरोनाचा धोका अजूनही टळला नसल्याने उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर (Collector Kaustubh Divegavkar) व पोलिस अधीक्षक नीवा जैन (Superintendent of Police Niva Jain) यांनी 18 ते 20 ऑक्टोबरदरम्यान जिल्हाबंदी जाहीर केली आहे.
तुळजापूरला जाण्यासाठी भाविकांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. तरीही, काही भाविक पायी जाण्याची शक्यता असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव त्या मार्गावरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार उस्मानाबाद ते हैदराबादकडे जाणारी वाहतूक औसा, उमरगामार्गे हैदराबादकडे तर हैदराबादहून येणारी वाहने हैदराबाद, उमरगा, औसामार्गे जातील. हैदराबाद ते औरंगाबाद या मार्गावरील वाहतूक उमरगा, औसा, लातूर, अंबेजोगाई, मांजरसुंबा, बीडमार्गे औरंगाबादकडे जातील. औरंगाबादहून येणारी वाहने औरंगाबाद, बीड, मांजरसुंबा, अंबेजोगाई, लातूर, औसा, उमरगामार्गे जाईल. उस्मानाबाद-सोलापूरकडे जाणारी वाहतूक वैरागमार्गे तर सोलापूरहून उस्मानाबादकडे जाणारी वाहतूक वैरागमार्गेच जाईल.
लातूर ते सोलापूर या मार्गावरील वाहतूक मुरुड, ढोकी, येडशी, बार्शी, सोलापूरमार्गे जाईल. सोलापूर ते लातूर या मार्गावरील वाहतूक सोलापूर, बार्शी, येडशी, ढोकी, मुरुड, लातूरमार्गे जाणार आहे. औरंगाबाद-सोलापूरमार्गावरील वाहतूक सोलापूर, बार्शी, येरमाळामार्गे जाईल. दुसरीकडे तुळजापूर-सोलापूर ही वाहतूक मंगरूळपाटी, इटकळ, बोरामणी, सोलापूरमार्गे जाईल तर सोलापूर-तुळजापूर रोडवरील वाहने सोलापूर, बोरामणी, इटकळ, मंगरुळपाटी, तुळजापूर अशी जातील. तुळजापूर-बार्शी रोडवरील वाहने तुळजापूर, उस्मानाबाद, वैराग, बार्शी तर बार्शी-तुळजापूर रोडवरील वाहतूक बार्शी, वैराग, उस्मानाबाद, तुळजापूर अशी जातील, असेही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशातून स्पष्ट केले आहे.
पोलिस अधीक्षकांचे आदेश...
कोजागरी पौर्णिमेसाठी तुळजापूरला येतात उस्मानाबाद, लातूर, नळदूर्ग, सोलापूर, उमरगा, हुमनाबाद, कलबुर्गी, बिदरहून भाविक
लाखोंची गर्दी होणार असल्याने राज्यातील व राज्याबाहेरील नागरिकांना 18 ते 20 ऑक्टोबरपर्यंत तुळजापूरात प्रवेश बंदी
भाविकांची संभाव्य गर्दीचा विचार करून वाहतूक मार्गात बदल; उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
कोजागरी पौर्णिमेसाठी पायी चालत जाण्यावर निर्बंध; कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे पोलिस प्रशासनाने घेतला निर्णय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.