याबाबत ह. भ. प. वसंत साठे यांनी तालुका पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
सोलापूर : पहाटेच्या सुमारास घरात घुसून एक वर्षाच्या चिमुकल्यास ओलिस धरत चोरट्यांनी (Thieves) एक लाख 68 हजारांचा ऐवज चोरून नेला. बीबीदारफळ (ता. उत्तर सोलापूर) येथील साठे वस्तीवर घडलेल्या या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत ह. भ. प. वसंत साठे यांनी तालुका पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. (Thieves stole gold jewellery and cash at Bibi Darphal in Solapur district)
बीबीदारफळ येथील लोकमंगल कारखान्याच्या परिसरातील साठे वस्तीवर ह. भ. प. वसंत साठे हे राहतात. त्यांच्या वस्तीच्या दोनशे मीटर परिसरात एकही वस्ती नाही. चोरट्यांनी ही संधी साधून शनिवारी (ता. 3) पहाटे दोनच्या सुमारास डाव साधला. वसंत साठे हे रात्री वीज असल्याने पाणी द्यायला शेतात गेले होते. जाताना त्यांनी घराला बाहेरून कडी लावली होती. दरम्यान, त्यांचा मुलगा सुनील हा लोकमंगल कारखान्यात नोकरीस आहे. ड्यूटी संपवून तो रात्री साडेबारा वाजता घरी आला होता. पहाटे दोनच्या सुमारास एक वर्षीय चिमुकला रडत असल्याने सुनील यांची पत्नी सोनल या पाणी आणण्यासाठी किचनमध्ये गेल्या होत्या. तेवढ्यात दोघे चोरटे त्यांच्या घरात शिरले. एकाने त्यांचा मुलगा हातात घेतला तर दुसऱ्याने सोनल यांचे तोंड दाबून त्यांना धमकी दिली. आवाज न करता कपाटातून सोने काढून देण्याची मागणी केली. घाबरलेल्या सोनलने कपाट उघडून एक लाख 68 हजारांचे दागिने त्यांना दिले. लागलीच चोरट्यांनी त्या चिमुकल्याला तेथेच टाकून पळ काढला, अशी माहिती तालुका पोलिस ठाण्याकडून मिळाली.
मास्क अन् काळा ड्रेस घालून आले होते चोर
चोरट्यांनी तोंडावर मास्क तर अंगावर काळा ड्रेस घातला होता. चोरी करताना त्या दोघांचीही भाषा मराठी होती. त्यातील एकजण म्हणाला, खूप दिवसांपासून प्रयत्न करतोय आम्ही, पण चोरी करता आली नाही. दरम्यान, चोरट्यांनी चिमुकल्याला ताब्यात घेतल्याने झोपेत असलेल्या पतीला उठवण्याचीही संधी सोनल यांना मिळाली नाही. फिर्यादीने दिलेल्या वर्णनानुसार पोलिस उपनिरीक्षक नेताजी बंडगर हे चोरट्यांचा शोध घेत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.