Thinner Sakal
सोलापूर

‘थिनर’ने मोडले पेट्रोल-डिझेलचे रेकॉर्ड!

पेंटिंग-स्क्रीन प्रिंटिंगच्या दरात भरमसाठ वाढ; लिटरसाठी मोजावे लागतात १५० रुपये

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - मागील तीन महिन्यांहून अधिक काळापासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम व त्यामुळे वाढती महागाइ सर्वांना जाणवत आहे. त्याचप्रमाणे पेंटिंग व प्रिंटिंग व्यवसायासाठी अत्यावश्यक केमिकल थिनरच्या दरात वाढ झाल्याने या क्षेत्रावर मोठा परिणाम जाणवत आहे. युद्धाला सुरवात झाल्यापासून थिनरच्या किमतीने पेट्रोल-डिझेलच्या किमतीला देखील मागे टाकले आहे. सध्या थिनर १५० रुपये लिटर मिळत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

युद्धापूर्वी थिनर १३० रुपये प्रतिलिटर विक्री होत असे. सध्या याच्या दरात २० रुपयांची वाढ झाल्याने रंगांच्या व स्क्रीन प्रिंटिंगच्या दरातही ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. युद्ध सुरू झाल्यापासून थिनरच्या किमतीने पेट्रोल-डिझेलच्या किमतीला देखील मागे टाकले आहे. लॉकडाउननंतर महागाईचा चांगलाच भडका उडाला असून, यात खाद्यतेलापासून ते इंधनाच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. पेंटिंग व स्क्रीन प्रिंटिंगसाठी अत्यावश्यक केमिकल म्हणून थिनरचा वापर केला जातो. मात्र, थिनरच्या किमतीने पेट्रोल व डिझेलच्या किमतींनाही मागे टाकले आहे. लॉकडाउन काळात थिनरचे दर तीन वेळा वाढले. शहर परिसरात रंग विक्री करणारी जवळपास १०० दुकाने आहेत.

थिनरची विक्री करणारी देखील बरीच दुकाने आहेत. दर महिन्याला शहरात १० हजार लिटर थिनर लागते. दरवाढीमुळे घराला रंग लावणे आता सर्वसामान्यांच्या हिशेबाबाहेर गेले आहे. त्यामुळे ग्राहकही खरेदी करताना विचार करू लागले आहेत. सध्या पेट्रोलचे दर १११ ते ११२ रुपये तर डिझेल शंभर रुपयाच्या आसपास आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पेट्रोल, डिझेलच्या तुलनेत थिनर हे लो ग्रेड असल्याने त्याचे दर अधिक असतात. यावर आजपर्यंत कोणत्याही सरकारचे नियंत्रण नाही. नेमके याबाबतीत दर कमी करण्यासंदर्भात कधी निर्णय होणार याची प्रतीक्षा व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांना लागली आहे. या दरवाढीकडे शासनाने आता लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

व्यावसायिक वैतागले

पेंट (रंग विक्री)चा व्यवसाय सुरू करण्यासाठी करोडो रुपयांची गुंतवणूक करून ठेवावी लागते. त्यात भर म्हणजे दुकानाचे भाडे, कर्मचाऱ्यांचे वेतन, वीजबिल, महापालिकेचे कर आणि इतर सरकारी टॅक्स भरताना व्यापाऱ्यांना कठीण बनले आहे. रंग व्यावसायिक महागाईमुळे हैराण झाले आहेत. यामुळे थिनर विक्रीपेक्षा पर्यायी व्यवस्था पाहात आहेत. रंगाच्या किमती ३० टक्क्यांनी वाढल्याने व्यवसाय कमी झाला आहे. यामुळे दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत असल्याने व्यवसायातील नफा कमी आणि गुंतवणूक अधिक झाली आहे. त्यामुळे बँकांचे कर्ज, ग्राहकांना दिलेल्या वस्तूंचे बिल थांबले आहे. अशा विविध कारणांमुळे अनेकजण व्यवसायातून माघार घेत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

आकडे बोलतात

रंग विक्रीची दुकाने - १००

स्क्रीन प्रिंटिंग प्रेस - २५०

महिन्याकाठी लागणारे थिनर - १० हजार लिटर

पेट्रोलचा दर - ११२.१४ रुपये

डिझेलचा दर - ९८.१३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ज्योती गायकवाड आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT