Accident News sakal
सोलापूर

Highway Accident : पुणे-सोलापूर महामार्गावरील अपघातात मोहोळमधील तरूणासह दोन महिला ठार

संतोष पाटील

अपघातातील मयतांमध्ये एक तरूण व दोन महिलांचा सामावेश असून ते सर्वजण मोहोळ तालुक्यातील आहेत.

टेंभुर्णी : पुणे-सोलापूर महामार्गावर (Pune-Solapur Highway) शिराळ (टें) गावानजिक पुण्याहून येणाऱ्या अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलवरील तीन जण ठार झाले. अपघातातील मयतांमध्ये एक तरूण व दोन महिलांचा सामावेश असून ते सर्वजण मोहोळ तालुक्यातील आहेत. हा अपघात शुक्रवारी रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास झाला असून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात (Tembhurni Police Station) याबाबत नोंद करण्यात आली आहे.

या अपघातामध्ये (Road Accident) महादेव रमेश ताकमोगे (वय 22 रा. डिकसळ ता. मोहोळ सध्या राहणार टेंभुर्णी), महानंदा विकास पवार (वय 45), सुषमा प्रकाश पवार (वय 40 रा. दोघीही देगांव ता. मोहोळ) हे तिघेजण ठार झाले. या अपघाताविषयी पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, शुक्रवारी रात्री महादेव ताकमोगे, महानंदा पवार व सुषमा पवार हे तिघेजण मोटारसायकलवर (एमएच 45/जे 8106) भीमानगरहून टेंभुर्णीकडे येत होते.

पुणे-सोलापूर महामार्गावरील शिराळ (टें) येथील जय मल्हार हाॅटेल समोर त्यांची मोटारसायकल आली असता पुण्याहून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातानंतर वाहन चालक न थांबता तेथून निघून गेला. या अपघातामध्ये अज्ञात वाहनाने दिलेली धडक एवढी जबरदस्त होती की, मोटारसायकलचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

यातील महादेव ताकमोगे व सुषमा पवार हे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले होते, तर महानंदा पवार यांना येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यासाठी आणले होते. परंतु, त्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या अपघाताविषयी महादेव दत्तात्रय जाधव (वय 38 रा. ऐकरूके ता. मोहोळ) यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वाती सुरवसे या करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT