मंगळवेढा- व्याजाच्या पैशाच्या बदल्यात तुझ्या नावे असलेली ५७ गुंठे जमीन आम्हाला दे, नाहीतर तुझे काही खरे नाही, असे म्हणून छळ केल्याप्रकरणी राम ज्ञानेश्वर मेटकरी (वय २७) याने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी देवयानी कुंडलिक शेंबडे, राहुल शेंबडे (रा. भीमनगर, मंगळवेढा), सचिन संगम मस्के (रा. डोंगरगाव) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
मृत राम मेटकरी हा फिर्यादी प्रभावती मेटकरी (वय ५०, रा. डोंगरगाव) यांचा मुलगा असून, ४ ऑक्टोबर रोजी सकाळी अकराच्या दरम्यान वरील तिघा आरोपींनी व्याजाच्या पैशाच्या बदल्यात ५७ गुंठे जमीन मागितली व तुझे काही खरे नाही, तुला व तुझ्या आईला तुरुंगात टाकतो, अशी धमकी दिली.
तसेच फिर्यादीच्या मुलाचे संशयित आरोपी सचिन मस्के याच्याकडे असलेले पैसे त्यास मागितले. त्यावेळी संशयितांनी राम मेटकरीला मारहाण केली. ५ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.३० वाजता वरील तिघा आरोपींच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध पिऊन राम मेटकरीने डोंगरगाव येथील राहत्या घरी आत्महत्या केल्याचे प्रभावती मेटकरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक अंकुश वाघमोडे तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.