सोलापूर : विवाहानंतर महिलेला मुलबाळ होत नसल्याने सासरच्यांनी दवाखान्यातून उपचारही घेतले मात्र, मुलबाळ झाले नाही. दरम्यान, विवाहात तुझ्या माहेरच्यांनी मानपान केला नाही, तुझ्या दवाखान्याचा खर्चही परवडत नाही. उपचारासाठी व पतीला नोकरीही नसल्याने माहेरुन पाच लाख रुपये घेवून ये म्हणत पतीसह सासू, सासरे व नणंद यांनी त्रास दिल्याची फिर्याद विवाहितेने सलगर वस्ती पोलिसांत दिली आहे. त्यानुसार सर्व आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही नक्की वाचा : खुशखबर...अंगणवाडी सेविकांची भरती सुरु...अधिक माहिती जाणून घ्या
सोलापुरातील महिलेचा विवाह 30 डिसेंबर 2015 मध्ये कुणाल देविदास गायकवाड याच्याशी झाला. विवाहानंतर काही दिवस त्यांचा संसार सुखाचा होता. त्यानंतर लगेचच सासरच्यांनी त्यांचे रुप दाखविले. विवाहात तुझ्या आई- वडिलांनी मानपान नीट केला नाही. काही संसारपोयोगी वस्तूही दिल्या नाहीत, असे म्हणत टोमणे मारायला सुरवात केली. तुला सासरी येथे सर्वकाही फुकटचे वाटते का, असे विचारत जाच केला. तुझ्या नवऱ्याला नोकरी नाही, तुझ्या दवाखान्याचा खर्चही परवडत नाही, त्यामुळे माहेरुन पाच लाख रुपये घेवून ये म्हणूनही छळ केला. दुसरीकडे तु माझ्या भावाची बायको म्हणून शोभत नाही म्हणून नणंद प्रियंका मंजुनाथ सितापुरे हिने त्या विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, विवाहितेच्या आई- वडिलांनी मुलीच्या सासरच्यांना समजवून सांगितले मात्र, ते हुंड्यावर ठाम राहिले. याला कंटाळून विवाहितेने थेट पोलिस ठाणे गाठले आणि सासरच्यांविरुध्द फिर्याद दिली. त्यानुसार पती कुणाल देविदास गायकवाड, सासरा देविदास कृष्णा गायकवाड, सासू अनिता देविदास गायकवाड आणि नणंद प्रियंका सितापुरे यांच्याविरुध्द पोलिसांनी गुन्हा नोंद केला. ही घटना सोलापुरातील सेटलमेंट फ्रि कॉलनी येथे घडली आहे.
हेही नक्की वाचा : वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर अन् विद्यार्थ्यांसाठी पर्वणी
दारु पिण्यास पैसे न दिल्याने मारहाण
सोलापुरातील संगमेश्वर नगरात राहणाऱ्या सिराज रजाक जकलेर याने दारु पिण्यास दोनशे रुपये न दिल्याने घराजवळील अकबर म. रफिक सय्यद यांना हाताने व लाथाबुक्क्याने मारहाण करुन जखमी केल्याची घटना मल्लिकार्जून नगरात घडली. दरम्यान, दारुच्या नशेतील सिराजला पैसे नाहीत म्हणल्याने मारहाण केल्याची फिर्याद अकबर यांनी एमआयडीसी पोलिसांत दिली आहे.
हेही नक्की वाचा : सिध्देश्वर एक्स्प्रेसच्या तांत्रिक तपासणीवर प्रश्नचिन्ह...नक्की वाचा
मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वाहनचालकाविरुध्द गुन्हा
सोलापूर- विजयपूर रोडवरुन तायप्पा सिद्राम साखरे (रा. जुनी धोंडीबा वस्ती, सिध्दारुढ मठ, रामवाडी) हे बुधवारी (ता. 5) बहिणीकडे पायी जात होते. सोरेगावच्या पुढे गायकवाड फार्म हाऊसजवळ आल्यावर मागून येणाऱ्या चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. त्यामध्ये तायप्पा गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले, मात्र गुरुवारी (ता. 6) त्यांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर विजापूर नाका पोलिसांत अज्ञात वाहनचालकाविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.