tragic incident occurred in Mohol farmer died due to an electric shock sakal
सोलापूर

Mohol News : इलेक्ट्रिक शॉक लागून एका शेतकऱ्याचा मृत्यू; मोहोळ तालुक्यातील घटना

राजकुमार शहा

मोहोळ : बोअरची मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या एका 32 वर्षीय शेतकऱ्याचा इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना राम हिंगणी ता मोहोळ येथे ता 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता घडली. राजवर्धन नारायण पाटील रा राम हिंगणी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

मोहोळ पोलिसां कडून मिळालेल्या माहिती नुसार, बुधवार ता 2 ऑक्टोबर रोजी राजवर्धन पाटील हे रामहिंगणी येथील शेतात राहतात. राजवर्धन हे मका व ज्वारीच्या पिकाला पाणी देण्यासाठी म्हणून बोअरची मोटर चालू करण्यासाठी गेले असता त्यांना पेटीचा इलेक्ट्रिक शॉक लागला व ते जागीच कोसळले. ही घटना राजवर्धन यांचे भाऊ हर्षवर्धन यांना त्यांच्या भाऊजई ने पळत येऊन सांगितली.

त्यावेळी हर्षवर्धन यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता भाऊ राजवर्धन हा पेटी जवळ पडलेल्या अवस्थेत दिसून आला. तातडीने त्याला रुग्णवाहिकेत उपचारासाठी मोहोळ येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात आणले असता तेथील डॉक्टरांनीही तपासून मृत घोषित केले. या घटनेची खबर हर्षवर्धन नारायण पाटील वय 36 रा राम हिंगणी यांनी मोहोळ पोलिसात दिली असून तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीसांसोबतची बैठक निष्फळ, तुतारी हाती घेण्याचं बड्या नेत्यानं केलं निश्चित, कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु

Badlapur School Crime: कोर्टानं कालच अटकपूर्व जामीन फेटाळला अन् आज शाळेच्या दोन्ही फरार विश्वस्तांना झाली अटक

Mohammad Shami: हात जोडून विनंती करतो...! मोहम्मद शमी संतापला, 'त्या' वृत्ताचा केला इन्कार

Pune Crime: पुण्यात भयंकर प्रकार! बिल्डरची सोसायटीतल्या रहिवाशांना मारहाण, अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न

Pune Crime : सोमवार पेठेतील शाळेतून दोन मुली बेपत्ता; समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT