पंढरपूर (सोलापूर) : पंढपूर शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. आता ग्रामीण भागातील घराघरात कोरोना प्रवेश केला आहे. पंढरपूर तालुक्यातील कौठाळी गावातील एकाच कुटुंबातील 12 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी एकाला सोलापूर येथे पाठवण्यात आले आहे तर इतरांवर वाखरी येथील एमआयटी कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पंढरपूर शहर व तालुक्यात गुरुवारी नव्या 78 रुग्णांची भर पडली आहे.
हेही वाचा : पंढरपुरातील कोरानाने उडविली जिल्ह्याची झोप; नवे बाधित 335, सहा जणांचा मृत्यू, 246 कोरोनामुक्त
पंढरपूर शहर व तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होताना दिसत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे पंढरपूरकरांची चिंता वाढली आहे. गुरुवारी (ता. 13) शहर व तालुक्यातील 359 जणांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. यामध्ये 78 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. आजअखेर तालुक्यात 1 हजार 529 जण कोरोनाबाधित झाले आहेत. कोरोना विषाणू संसर्गामुळे 27 जणांचा बळी गेला आहे, अशी माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
पंढरपूर शहरात 14 ऑगस्टपर्यंत लॉकडाउन जाहीर केला आहे. यादरम्यान रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात येत आहेत. गेल्या सहा दिवसांमध्ये शहर व तालुक्यातील 3 हजार 437 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 692 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात एकाच घरातील 12 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे. आजअखेर कोरोनाबाधितांची संख्या एक हजार 529 वर पोचली आहे. आतापर्यंत यशस्वी उपचारानंतर 537 जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर तब्बल 887 जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.