सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. या परीक्षेत सोलापूर जिल्ह्याचा निकाल 97.53 टक्के लागला असून जिल्ह्यातील तीन मुलींनी 100 टक्के गुण मिळवून राज्यात झेंडा रोवला आहे. यात पंढरपूर, मंगळवेढा व बार्शी तालुक्यातील विद्यार्थिनींचा समावेश आहे.
हेही वाचा : मुख्यमंत्री शिवसेनेचा, रुबाब राष्ट्रवादीचा; तानाजी सावंत डिस्कनेक्ट, आमदार प्रभूंवर सोलापूरची धुरा
सोलापूर जिल्ह्यातील 968 शाळांमधील 63 हजार 594 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 63 हजार 193 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती 61 हजार 633 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सोलापूर जिल्ह्याचा तालुकानिहाय लागलेला निकाल याप्रमाणे : अक्कलकोट 96.43, बार्शी : 98.28, करमाळा, 96.31, माढा 97.26, माळशिरस 97.24, मंगळवेढा : 97.61, मोहोळ 98.56, पंढरपूर : 97. 57, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व सोलापूर शहर : 97.63, सांगोला तालुक्याचा दहावीचा निकाल 97.78 टक्के एवढा लागला आहे. यात पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील दोन मुलींनी 100 टक्के गुण मिळवले आहे.
हेही वाचा : धक्कादायक! कोविड केअर सेंटरमधील महिलेचा मृत्यू; नातेवाइकांचा गोंधळ अन् प्रशासनाचे चौकशीचे आदेश
पंढरपूरच्या सावनी दोशीने मिळवले 100 टक्के गुण
दहावीच्या परीक्षेत पंढरपूरच्या कवठेकर प्रशालेची विद्यार्थिनी सावनी तारकेश्वर दोशी हिने 100 टक्के गुण प्राप्त केले. प्रशालेचा निकाल 96.66 टक्के लागला असून प्रशालेतून अनुक्रमे सावनी दोशी 100 टक्के प्रथम, आशीर्वाद राजेश्वर कटकमवार 98.60 टक्के द्वितीय तर सायली नरेंद्र भंडारकवठेकर हिने 98.40 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष सुधाकर परिचारक, अध्यक्ष वा. ना. उत्पात, संस्थेचे सचिव मो. चि. पाठक, वा. गो. भाळवणकर, नानासाहेब रत्नपारखी, सु. र. पटवर्धन व सर्व पदाधिकारी तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक एस. पी. कुलकर्णी, उपमुख्याध्यापिका अंजली बारसावडे, पर्यवेक्षक व्ही. एम. कुलकर्णी, आर. जी. केसकर, एन. बी. बडवे सर्व शिक्षक व शिक्षकेतर यांनी अभिनंदन केले.
मंगळवेढ्याच्या ज्ञानेश्वरी पाटीलने पटकावले 100 टक्के गुण
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च 2020 घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत तालुक्याच्या निकाल 97.60 टक्के लागला. निम्म्याहून अधिक शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या निकालाचा टक्का 13 टक्यांनी वाढला. शहरातील इंग्लिश स्कूल या माध्यमिक शाळेतील ज्ञानेश्वरी धनंजय पाटील हिने शंभर टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.