अपघात sakal
सोलापूर

कोंडीजवळील अपघातात सहाणांचा मृत्यू! जखमीतील दोघांचा आज मृत्यू

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी गावाजवळ 13 मार्च रोजी रात्री दहाच्या सुमारास सिमेंट वाहून नेणाऱ्या ट्रकने ट्रक्‍टरला मागून जोरात धडक दिली होती. या अपघातात एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या (कदमवाडी ता. तुळजापूर) येथील चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला होता. तर सातजण गंभीर आणि 16 जण किरकोळ जखमी झाले होते. त्यातील आणखी दोन महिलांचा शनिवारी (ता. 19) मृत्यू झाल्याने अपघातातील मृतांची संख्या आता सहा झाली आहे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी गावाजवळ 13 मार्च रोजी रात्री दहाच्या सुमारास सिमेंट वाहून नेणाऱ्या ट्रकने ट्रक्‍टरला मागून जोरात धडक दिली होती. या अपघातात एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या (कदमवाडी ता. तुळजापूर) येथील चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला होता. तर सातजण गंभीर आणि 16 जण किरकोळ जखमी झाले होते. त्यातील आणखी दोन महिलांचा शनिवारी (ता. 19) मृत्यू झाल्याने अपघातातील मृतांची संख्या आता सहा झाली आहे.

कोरोनामुळे पांडूरंगाचे दर्शन घेता आले नाही म्हणून कदमवाडी व परिसरातील गावातील एकमेकांचे नातेवाईक, असे 23 जण गावातील ट्रॅक्‍टर भाड्याने करून 13 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास पंढरपूरला निघाले होते. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठापासून एक किलोमीटर अंतरावरील कोंडी गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (एमएच 12, टीव्ही 7348) ट्रॅक्‍टरला मागून जोरात धडक दिली. अक्षरश: ट्रक चालकाने ट्रॅक्‍टरला जवळपास दोनशे ते अडीचशे फुटापर्यंत फरफटत नेले. महामार्गावरील लोखंडी जाळीदेखील तुटून पडली आहे. ट्रकच्या धडकेत ट्रॅक्‍टरमधील काहीजण महामार्गावर व आजूबाजूला उडून पडले होते. बहुतेकजणांना दुखापत झाली होती. सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण फुगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव यांनीही घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पोलिसांनी ट्रक चालकाला सावळेश्‍वर टोल नाक्‍यावरुन अटक केली आहे. ट्रकचे टायर फुटल्याने अपघात झाल्याचे चालकाने सांगितले आहे. पण, तो टायर अपघातापूर्वी की अपघातानंतर फुटला, याची पडताळणी आरटीओ करीत आहेत. पोलिस निरीक्षक अरुण फुगे तपास करीत आहेत.

अपघातातील मृतांची नावे
ज्ञानेश्‍वर दत्ता साळुंखे (वय 16), जशान मिसाळ (वय 60), तुकाराम सुदाम शिंदे (वय 20), भागाबाई मिसाळ (वय 60) यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. त्यानंतर आज (शनिवारी) जनाबाई फुलचंद घाडगे (वय 68, रा. राखेल, ता. तुळजापूर) आणि सत्यभामा दिलीप मिसाळ (वय 48, रा. कदमवाडी, ता. तुळजापूर) यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT