माजी आमदार नारायण पाटील  Sakal
सोलापूर

करमाळा : माजी आमदार नारायण पाटील करणार वीज प्रश्नावर धरणे

उजनी बॅकवॉटर परिसरातील वीज पुरवठा हा महावितरण कडून खंडीत केला.

सकाळ वृत्तसेवा

करमाळा : करमाळा तालुक्यात महावितरण कडुन वीज कनेक्शन कट करण्यात आल्याने तात्काळ वीजपुरवठा सुरू करावा अन्यथा सोमवार ता.28 रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे  माजी आमदार नारायण पाटील यांनी दिला आहे.

    करमाळा तालुक्यातील काही भागात विशेषतः उजनी बॅकवॉटर परिसरातील वीज पुरवठा हा महावितरण कडून खंडीत केला गेला असून शेतकरी वर्गात याबाबत प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. या प्रश्नावर महावितरणचे व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांनी तहसिलदार यांना एक निवेदन सादर करुन आंदोलनाचा इशारा दिला आहे.   

याबाबत अधिक माहिती देताना माजी आमदार पाटील यांनी सांगितले की,करमाळा तालुक्यातील उजनी बॅकवॉटर परिसरातील कृषीपंपाचा वीजपुरवठा गेले दहा दिवसापासून बंद करण्यात आला आहे. महावितरण विभाग वीजबिल वसुलीचे कारण दाखवून कृषीपंप वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम अधिक वेगाने करत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. करमाळा तालुक्यातील ऊस, केळी, द्राक्ष या नगदी पिकासह भाजीपाला व इतर पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान यामुळे झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

शेतातील उभ्या पिकांचे पैसे, ऊस व केळी बिलाची रक्कम हाती आल्यानंतर अवश्य स्वतःहुन वीज बिल भरतो पण आता वीजजोड तोडू नका अशी विनंती शेतकरी महावितरणला करत असताना सुद्धा महावितरणकडून या वीजतोड मोहीमेस ब्रेक लागत नाही.यामुळेच आता करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा हा महत्वाचा प्रश्न सुटावा म्हणून सोमवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता आपण स्वतः करमाळा तहसील कार्यालया समोर लोकशाही मार्गाने शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये एक दिवसाचे धरणे आंदोलन करणार आहे.

या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, उर्जाराज्यमंत्री ना. तनपुरे, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख,अधिक्षक अभियंता महावितरण, उपविभागीय अभियंता महावितरण, कार्यकारी अभियंता महावितरण, उप अमियंता करमाळा, पोलिस निरीक्षक करमाळा देण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cash Seized: निवडणुकीच्या धामधुमीत पावणेदोन कोटींवर मुद्देमाल जप्त; 80 लाखांचे अमली पदार्थ तर 27 लाखांच्या दारूचा समावेश

Vidhansabha Nivadnuk 2024: काका-पुतणे झाले, आता महाराष्ट्र पाहणार मामा-भाच्याची लढत; कुठे रंगणार सामना? कोण मारणार बाजी?

IND vs NZ, Mumbai Test: भारतीय संघातून जसप्रीत बुमराह, तर न्यूझीलंड संघातून सँटेनर बाहेर; पाहा दोन्ही टीमच्या प्लेइंग-११

Google Fined: रशियाने गुगलला ठोठावला डॉलर 20,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000चा दंड

Aslam Sheikh Education: "आधी बारावी अन् मग नववी..." काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या शिक्षणावरुन गोंधळ; भाजपच्या आरोपामुळे खळबळ

SCROLL FOR NEXT